आपला अभिनय आणि सौंदर्याने सगळ्यांना भुरळ घालणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्याला काही तरी वेगळं देत असते. आणि याचमुळे सोनाली नेहमी प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. तिच्या अभिनयासोबत नृत्य कौशल्यानेसुद्धा सोनालीने तिचे मराठी चित्रपटसृष्टीमधील स्थान अव्वल ठेवले आहे. नटरंग चित्रपटामधून आपल्यासमोर अप्सरा म्हणून आलेली सोनाली आज सुद्धा तेवढीच लोकप्रिय आहे. 


सध्याच्या परिस्थितीमुळे सारे कलाकार त्यांना जमेल तश्या पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आणि याच दरम्यान सोनाली कुलकर्णी हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पहिल्यांदा ऑनलाईन लावणी वर्कशॉप सुरु करणार असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोनाली आता ऑनलाईन वर्कशॉपच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या भेटीला येणार असून आपल्या नृत्य कौशल्याचे काही धडे सोनाली तिच्या चाहत्यांना देणार आहे. ज्यापद्धतीने सोनालीचे चाहते हे तिच्या अभिनयाचं कौतुक करतात, त्याच प्रमाणे सोनालीच्या नृत्याचं सुद्धा तेवढ्याच पद्धतीने कौतुक करतात. सोनाली कुलकर्णीचा हा ऑनलाईन लावणी वर्कशॉप, येत्या ९ ऑगस्ट रोजी बघायला मिळणार आहे. फक्त भारतामधील चाहत्यांनाच नाही तर,,  इतर देशांमध्ये सुद्धा सोनाली कुलकर्णींचा हा लावणी वर्कशॉप  पाहता येणार आहे. ज्यामध्ये अमेरिका, युरोप आणि दुबई या देशांचा समावेश असणार आहे. हिरकणी चित्रपटांमधून आपल्यावर अभिनयाची छाप सोडणारी सोनाली आता नृत्याचे धडे आपल्याला देणार आहे. आणि सोनालीच्या या उपक्रमाला सुद्धा तिचे चाहते तेवढाच चांगला प्रतिसाद देतील एवढं मात्र नक्की...