मालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरु झाले असल्यामुळे, नवीन भागांची गाडी जशी नव्या वेगाने धावू लागली आहे, तशीच देवा आणि मोनिकाच्या प्रेमाची गाडी सुद्धा आता ट्रॅकवर येऊ लागली आहे. देवा भाईबद्दलचं मोनिकाच्या मनातील किल्मिष आता हळू हळू कमी होत आहे. त्यांची प्रेमकहाणी आकार घेत आहे. 

'झी युवा' वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेचा एक मजेदार प्रोमो सध्या वाहिनीवर पाहायला मिळतोय. प्रेम मिळवण्यासाठी आणि मोनिकावर छाप पाडण्यासाठी देवा सध्या काय काय प्रयत्न करतोय, ते या प्रोमोमध्ये बघायला मिळतंय. देवा आणि मोनिकाची केमिस्ट्री जुळू लागल्यामुळे, आता मालिकेत सुद्धा नवे रंग भरू लागले आहेत.

शाळेच्या गणवेशात, देवाभाई मोनिका यांच्या घरी जातो. त्याच्या खास शैलीत 'आपण सुद्धा तुमचा विद्यार्थी आहे ना, मग आपल्याला का नाही शिकवणार' हा खास डायलॉग ऐकल्यावर मात्र मोनिका वैतागते. देवा आता त्याच्या खास शैलीत मोनिकावर छाप पडताना दिसणार आहे. खरंतर तो आता त्यांच्या प्रेमाची बाराखडी गिरवू लागला आहे, असं म्हणता येईल. 'झी युवा, वाहिनीवर सोमवार ते शनिवार, रोज रात्री ९ वाजता ही प्रेमकहाणी अनुभवता येणार आहे. तेव्हा, पाहायला विसरू नका, आपली सगळ्यांची लाडकी मालिका, 'डॉक्टर डॉन'!!!!