मराठी अभिनेता चिराग पाटील हा, बॉलीवूड मधील बहुचर्चित ८३ या चित्रपटामधून आपल्या भेटीला येणार आहे. आणि या चित्रपटामधून चिराग पाटील माजी क्रिकेटर संदीप पाटील यांची भूमिका निभावणार आहे. १९८३ मध्ये भारताने पहिला वर्ल्ड कप जिकंला, आणि याच विषयावर आधारित हा चित्रपट असणार आहे. 

नुकतच चिरागने वडिल संदीप पाटील यांच्यासोबतचे काही व्हिडीओ आणि फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. ८३ चित्रपटाच्या निमिताने, चिराग पाटील याने, त्याच्या वडिलांकडून म्हणजेच संदीप पाटील यांच्या कडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतेले. आणि त्यांचे हे प्रशिक्षण चिरागला त्याच्या खूप उपयोगी पसल्याचे त्याने कबुल केले आहे. संदीप पाटील यांची क्रिकेट खेळण्याची स्टाईल आणि बऱ्याच गोष्टी या सिनेमाच्या निमित्ताने चिरागला शिकायला मिळाल्या. Cricket Lessons From The Master Himself असं कॅप्शन देत चिरागने, संदिप पाटील यांच्या सोबतच्या व्हिडिओ शेअर केल्या आहेत. १९८३ मध्ये भारताने जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कप वर हा चित्रपट आधारित आहे. आणि या चित्रपटामध्ये चिराग पाटील सोबत आदिनाथ कोठारे हा मराठी कलाकार सुद्धा झळकणार आहे.