सध्याच्या परिस्थिती मुळे सगळ्याच गोष्टींवर बंधने आणली आहेत.  मग त्यामध्ये आपल्या मित्रांसोबत बाहेर जाणं असो किंवा पावसाळा सुरु झाल्यामुळे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पिकनिकला जण असो. आणि या सगळ्यामुळे कित्येक ट्रेकर घरीच बसले आहेत. 

पण सध्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमधून आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावणारे, अभिनेते शंतनू मोघे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री प्रिया मराठे हे दोघे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दोघांनी सिंहगड गाठला. नुकतच प्रिया आणि शंतनुने त्यांच्या या ट्रेकिंगचे काही फोटो पोस्ट केले आहेत. प्रिया मराठे हिने तिच्या इंस्टाग्राम वर मी इतक्यांदा पुण्याला आले आहे पण सिंहगड पाहण्याची वेळ कधीच आली नव्हती.. अखेर काल तो दिवस उजाडला आणि मी सिंहगड पहिला, नुस्ता पहिलाच नाही तर अनुभवला. असं कॅप्शन देत तिची सिंहगड चढायची ईच्छा पूर्ण करत तिचे फोटो शेअर केले. तर याउलट शंतनू मोघे याने, निसर्ग हिरवा, शिव विचार भगवा, जय शिवराय, नरवीर तानाजी मालुसरे ह्यांना मानाचा मुजरा अश्या पद्धतीने महाराज आणि तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा करत. ट्रेकिंगच्या वेळेसह काही फोटो शेअर केले आहेत. सिंहगडाचे वैभव जाणून घेतल्यानंतर आणि त्याची चढाई केल्यानंतर प्रिया आणि शंतनू यादोघांच्या चेहेऱ्यावरील आनंद आपण त्यांच्या फ़ोटोज वरून बघू शकतो.