आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना नवीन संदर्भ दाखवणारा दिग्दर्शक साकार राऊत याने आपल्यासमोर टायची अजून एक कथा सादर केली आहे. आणि ते म्हणजे त्याचा नवा कोरा चित्रपट 'अजूनी', अंजली, अस्मिता या मालिकांमधून घराघरांत पोहचलेला अभिनेता पियुष रानडे या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

पियुषने आजवर अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र त्याच्यासाठीही अजूनी हा चित्रपट महत्त्वाचा असा आहे.  नुकतंच पियुष रानडे याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, अजुनी - जन्म किंवा मृत्यूला बांधील नसलेला असं कॅप्शन देत या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.  चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी असून, मावळतीचा सूर्याच्या तेजानं उजळलेलं नभांगण आणि त्यात उभा असलेला तरुण असं हे पोस्टर खूप अर्थपूर्ण आहे. या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेच्या अनेक शक्यतांचा अंदाज बांधता येऊ शकतो.  अर्थ स्टुडिओज आणि सारा मोशन प्रा.लि. यांनी अजूनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ध्वनि साकार राऊत आणि साकार राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नावातच काव्यमयता असलेला हा चित्रपट साकारच्या या पूर्वीच्या चित्रपटांपेक्षा खूपच वेगळा ठरणार आहे. मराठी चित्रपटाच्या दृष्टीनेही या चित्रपटाची कथा नवा आयाम ठरू शकेल. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजून तरी या चित्रपटामध्ये पियुष रानडे सोबत कोणते कलाकार दिसून येतील हे मात्र गुलदस्त्यात आहे.