खुलता कळी खुलेना  मालिकेमध्ये सगळ्यांच्या भेटीला आलेल्या मयुरी देशमुखने  खूप कमी वेळात सगळ्यांच्या मनात घर केले. आणि फक्त मालिका नाही तर मराठी नाटक आणि एकांकिकेमधून मयुरीने तिच्या अभिनयाची झलक आपल्यासमोर सादर केली आहे. 

परंतु आता मयुरी देशमुखबाबत हि दुःखद घटना घडली आहे आणि ती म्हणजे, मयुरी देशमुखच्या नवऱ्याने म्हणजे आशुतोष भाकरे याने आत्महत्या केली आहे. आशुतोषने नांदेडला त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आशुतोषने आत्महत्या का केली याचे कारण अजून तरी कोणासमोर आले नाही आहे. काही दिवसांपूर्वी आशुतोषने त्याच्या फेसबुक अकाउंटवर लोक आत्महत्या का करतात ? याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. पण आता खुद्द आशुतोषनेच आत्महत्या का केली हे मात्र अजून कोणाला समजलं नाही. आशुतोषच्या या मयुरी देशमुखच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मयुरीने या आधी ‘डिअर आजो’ आणि तिसरे बादशहा हम या नाटकांमध्ये काम केले आहे.