आपल्या आवाजाने प्रत्येकाच्या मनात घर करणारी गायिका आणि सा रे ग म प लिटिल चॅम्पस पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाडने एक आनंदाची बातमी आपल्यासोबत शेअर केली आहे. आणि ती बातमी म्हणजे नुकताच कार्तिकीचा सारखरपुडा संपन्न झाला आहे. 

कार्तिकी नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोडलेली असते. आणि याच माध्यमातून कार्तिकेने तिचा सारखरपुडा झाल्याची बातमी आपल्या सोबत शेअर केली आहे. रोनित पिसे असं कार्तिकीच्या जोडीदाराचं नाव असून, पुण्यामध्ये इंजिनिअर म्हणून काम करत आहे. याआधी सुद्धा कार्तिकीने तिचा आणि रोनितचा साखरपुडा ठरल्याची बातमी आपल्याला दिली होती. आणि आता कार्तिकिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एंगेज्ड असं कॅप्शन देत साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी आपल्या सगळ्यांची लाडकी गायिका, कार्तिकी गायकवाड आता तिच्या आयुष्याच्या नव्या टप्प्यामध्ये प्रवेश करत आहे. आपल्या गोड आवाजाने सगळ्यांचे मनोरंजन करणाऱ्या कार्तिकी गायकवाडला तिच्या पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा..