झी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका लागीर झालं जी, आज सुद्धा प्रेक्षकांच्या मनात रुजली आहे. आणि याच सगळं श्रेय मालिकेच्या कलाकारांना जात. आणि म्हणूनच आज सुद्धा हे कलाकार प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. लागीर झालं जी मालिकेमधून आपल्या भेटीला आलेला अज्या आज सुद्धा सोशल मिडीयाच्या मदतीने प्रेक्षकांसोबत जोडलेला असतो. आणि याच सोशल मिडीयाच्या मदतीने नितीश चव्हाणने त्याच्या पुढील प्रोजेक्ट्ची बातमी आपल्यासोबत शेअर केली आहे. आणि ती बातमी म्हणजे नितीश चव्हाणचा नवीन चित्रपट. 

२६ जुलै २००५ हा दिवस कोणच विसरु शकत नाही. या दिवशी संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली होती, आणि यामुळे संपूर्ण मुंबईचे जीवन विस्कळीत झाले होते. २६ जुलैला आलेल्या महापुराची आठवण आज सुद्धा सगळ्या मुंबईकरांच्या डोक्यात आहे. आणि याच विषयावर आधारित नितेश चव्हाण याचा नवा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. "Mumbai may be underwater.. But spirit of Mumbaikar's can never" असं कॅप्शन देत अभिनेता नितीश  चव्हाण याने, त्याच्या इंस्टाग्राम पेज वर त्याच्या नवीन चित्रपटचं मोशन पोस्टर आपल्या सोबत शेअर केलं आहे. २००५ साली आलेला महापूर आणि त्याच्या सोबत असणाऱ्या अनेक आठवणी यासाऱ्यांवर आधारित दिग्दर्शक राजू राणे यांचा हा नवा कोरा चित्रपट लवकरचं आपल्या भेटीला येणार आहे. आणि या चित्रपटामधून लागीर झालं जी फेम, नितीश  चव्हाण सुद्धा पुन्हा एकदा आपल्या समोर, आपले मनोरंजन करायला येणार आहे. तूर्तास तरी नितीश चव्हाण सोबत या चित्रपटामध्ये अजून कोणते कलाकार दिसून येतील हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.