गेले चार महिने सगळीकडेच लॉकडाऊन सुरु होता, आणि याचमुळे चित्रपटसृष्टी ते मालिकांचे शूटिंग हे सारं काही थांबलं होत. पण आता सुरळीतपणे मालिकांचे आणि चित्रपटांचे शूटिंग सुरु झाले आहे. आणि सारेच कलाकार नव्या जोमाने मालिका आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात केली आहे. आणि याबद्दलची माहिती सारे कलाकार त्याच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवरून, फोटो शेअर करून देत आहे. 

नुकतंच स्ट्रगलर साला या मराठी वेब सिरीज मधून सगळ्यांच्या पसंतीस आलेला बाबा म्हणजेच अभिनेता अभिजित चव्हाण याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये चार महिन्यांनी चेहऱ्याला रंग लागला.. किती नशीबवान मी चार महिन्यांनी अभिनय करण्याची लाभली संधी ती सुद्धा माझ्याच गावात ..सिंधुदुर्गात असं कॅप्शन देत लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा अभिनय करायाची संधी मिळाली त्याबद्दल आभार व्यक्त करत आहे. लॉकडाऊन झाल्यापासून अभिजित चव्हाण हा त्याच्या गावी म्हणजेच सिंधुदुर्गात गेला होता. आणि तिकडे राहून सुद्धा अभिजित इंस्टाग्राम द्वारे त्याच्या चाहत्यांच्या सोबत साधत असायचा. आणि आता तब्बल चार महिन्यानंतर अभिजितला सिंधुदुर्गामधील एका जाहिराती मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. आणि एकूणच चार महिन्यानंतर चेहेऱ्याला मेकअप लागल्याचा आंनद त्याने आपल्यासोबत शेअर केला आहे.