आपल्या दिग्दर्शनामधून चित्रपटाचा एक वेळगे पाळीव आपल्यासमोर मांडणारा, एक दिग्दर्शक आणि एक अभिनेता रवी जाधव नेहमीच आपल्यासाठी काही  असतो. मग त्यामध्ये चित्रपट दिग्दर्शनाचं काम असुदे किंवा एक पटकथाकार रवी जाधवने आपल्यासमोर सादर केलेल्या कलाकृतींचं सारे प्रेक्षक मनभरून कौतुक करतात. 

सध्या रवी जाधव सोशल मीडियावर खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह आहे. रवी जाधव त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून नेहमीच काही तरी नवीन आणि वेगळं आपल्या सोबत शेअर करत असतो. मग त्यामध्ये त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमधील Behind The Scene, नाही तर जुने फोटो,पण यावेळी मात्र रवी जाधव ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, #mirror #reflection #mymovieframes असे कॅप्शन देत काही फोटो शेअर केले आहेत. आणि या फोटोंमधील एक वेगळी बाब म्हणजे, हे फोटो रवी जाधव याच्या चित्रपटामधील असून कलाकारांचे आरश्यामधील प्रतिबिंब टिपत हे फोटो काढण्यात आले आहेत. ज्यामध्ये बालगंधर्व, नटरंग, न्यूड  या चित्रपटांमधील कलाकारांचा समावेश आहे. एक दिग्दर्शकाला कॅमेराची सुद्धा माहिती असणं किती गरजेचं असतं,  या गोष्टीच उत्तम उदाहरण रवी जाधवच्या या फोटोज वरून आपण पाहू शकतो. नटरंग, बालगंधर्व, न्यूड यांसारख्या जबर्दस्थ चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर रवी जाधव निर्मित आणि  हृता दुर्गुळेची मुख्य भूमिका असणारा अनन्या चित्रपट सुद्धा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.