'प्रेम' सहज आणि सोपं अस कधीच नव्हतं, एखादया व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे एक वेगळीच परीक्षा आहे. रोमियो जुलियट, सलीम अनारकली, लैला मजनू अशी अनेक उदाहरण आहेत ज्यांनी प्रेमाची एक वेगळी कसोटी जगासमोर आणली होती. २१व्या शतकात सुद्धा या कसोटीला पर्याय उपलब्ध झालेला नाही आहे आणि हेच सांगायला  एम एक्स प्लेयर घेऊन येत आहे 'शिवराज वायचळ' आणि 'शिवानी रांगोळे' यांची प्रमुख भूमिका असलेली सीरिज 'इडियट बॉक्स'. पाच एपिसोडची ही सीरिज आकाश (शिवराज) त्याच्या प्रेयसी शाश्वतीला मिळवण्यासाठी करत असलेली धडपड आणि यासाठी त्याची मदत करणारी सायली (शिवानी रांगोळे) यांची एक वेगळीच धमाल कथा सांगत आहे

                     हेरगिरी करण्यापासून ते आपल्या प्रेयसीच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर लढणाऱ्या एका कट्टर प्रेमीं आपल्या प्रेयसीला परत मिळवण्याचा प्रवास 'इडियट बॉक्स' ही सीरिज सांगते. या सीरिजचा प्रत्येक भाग बघताना तुम्हाला तुमच्या आवडत्या मालिकांसारखा वाटेल. या सीरिज बद्दल आकाश म्हणजेच शिवराज सांगतो 'आयुष्यात प्रत्येक जण या सगळ्यातून जातो, आपल्या प्रेयसी प्रियकर यांना परत मिळवण्यासाठी प्रत्येक जण एकदा तरी प्रयत्न करतोच. इडियट बॉक्स सीरिज त्यांचीच कथा तुमचा समोर रंजकतेने मांडते. आकाशची ही प्रेम कथा आणि त्याचा हा प्रवास अनेकांना आपलासा वाटणारा आहे आणि हेच मला फार आवडलं आहे, आणि ते प्रेक्षकांना ही आवडेल हे नक्की.' ' सायली ही अशी व्यक्ती आहे जी तिच्या मित्राला सुखी बघण्यासाठी शक्य ते करू शकते. 

या पात्रांची सगळ्यात भावणारी गोष्ट म्हणजे तीच स्वतःचा स्वार्थ न जपता आकाशची मदत करणं. सुरुवातीला एक साधं पात्र जरी वाटत असल तरी नंतर 'सायली'चे अनेक पैलू तुम्हाला दिसू लागतील. निरागस आणि अगदी टीव्ही मालिकेसारखी असलेली ही सीरिज या मान्सून मध्ये बघण्यासाठी उत्तम आहे.' असं सायली साकारत असलेली शिवानी रांगोळे आपल्या पात्राबद्दल सांगते. जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांच दिग्दर्शन असलेल्या या सीरिज मध्ये स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, पुष्कर जोग, संस्कृती बालगुडे, अक्षय टाकसाळे, प्रवीण तरडे, मृणाल कुलकर्णी, सुनील बर्वे आणि आशय कुलकर्णी असे मराठीतले दिग्गज आणि आघाडीचे कलाकार आहेत. ही सीरिज मराठी व्यतिरिक्त हिंदी, तामिळ,तेलुगू या भाषांमध्ये २४ तारखेपासून एम एक्स प्लेयरवर विनामूल्य पाहता येणार आहे.