लोककला, भारूड, भीमगीते, कोळीगीते  ते आताच्या काळामधील क्लासिकल संगीत या सगळ्या गायन  प्रकारामध्ये, मराठी चित्रपट आणि लोककलेमधील एक कुटुंब नेहमीच पुढे राहिले आहे आणि ते म्हणजे स्वर्गीय प्रल्हाद शिंदे यांचे शिंदे कुटुंब, आज शिंदे कुटुंबामधील तिसरी पिढी आपल्या साऱ्यांचे संगीतामार्फत मनोरंजन करत आहे. 

नुकतंच या शिंदेशाही घरण्यामधील तिसरी पिढी आदर्श शिंदे याने, जुन्या आठवणींना उजाळा देत एक फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. आदर्शने त्याच्या आजोबांचा म्हणजेच स्वर्गीय प्रल्हाद शिंदे यांचा एक दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. 'माझे आजोबा स्वर सम्राट “प्रल्हाद शिंदे” स्वतः ढोलक वाजवून गाणं सादर करतानाचा दुर्मिळ फोटो.कधी कधी साथ करायला एखादा वादक नसेल तर आजोबा स्वतःच ते वाद्य वाजवायचे मग ते ढोलक असो,तबला असो किंवा Harmonium असो.. असं कॅप्शन देत आदर्श शिंदे याने त्यांच्या शिंदेशाही परिवारामधील एक दुर्मिळ फोटो आपल्यासमोर शेअर केला आहे. प्रल्हादें शिंदे यांची अनेक  गाणी आज सुद्धा प्रेक्षक गुणगुणतात. आणि त्याच्या गाण्याचा वारसा त्याच्या पुढची पिढी मिलिंद आणि आनंद शिंदे हे चालवत आहेत. सध्या अनेक मराठी चित्रपट आणि इतर कार्यक्रमामधून शिंदे घराण्याची तिसरी पिढी म्हणजेच आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे हे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. पुढे सुद्धा हे शिंदेशाही घराणं आपलं मनोरंजन करतंच राहील यामध्ये काही वाद नाही.