संदिप खरे आणि सलील कुलकर्णी या जोडीने गेले अनेक वर्षे त्याच्या गाण्याने आणि कवितांनी आपले मनोरंजन केले. आयुष्यावर बोलू काही ...या कार्यक्रमामधून सगळ्यांच्या घरा घरामध्ये पोचलेली हि जोडी नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. दमलेल्या बाबांची, नसतेस घरी ते जेव्हा, जरा चुकीचे अशी अनेक गाणी या कार्यक्रमाने आपल्याला दिली. संदिप खरे आणि सलील कुलकर्णी हि जोडी दरवेळेला आपल्यासमोर काही तरी नवीन घेऊन येत असते. मग त्यांचे लाईव्ह कॉन्सर्ट असो किंवा टिव्ही वरील प्रेक्षेपण, त्यांचा समस्त चाहता वर्ग दरवेळेला या जोडीला डोक्यावर घेतात. 

यावेळी सुद्धा संदिप खरे आणि सलील कुलकर्णी हि जोडी आपल्यासाठी काही तरी खास घेऊन येणार आहे. आणि ते म्हणजे आयुष्यावर बोलू काही ..या   कार्यक्रमाला येत्या १ ऑगस्टला १७ वर्षे पूर्ण होऊन १८ व्या वर्षामध्ये पदार्पण होणार आहे. आणि या निमित्तांने सलील कुलकर्णी याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक आनंदाची बातमी प्रेक्षकांसाठी दिली आहे. आणि ते म्हणजे येत्या १ ऑगस्टला आयुष्यावर बोलू काही ...हा कार्यक्रम आपण घरबसल्या बघू शकतो. आणि ते सुद्धा ऑनलाईन, सलील कुलकर्णीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबद्दलचा एक फोटो शेअर केला आहे. ३ ऑगस्ट ,२००३ ला 'आयुष्यावर बोलू काही' ची पहिली मैफल साजरी झाली आणि त्यानंतर आधी महाराष्ट्रातील अनेक शहरांत .. मग भारतभर अनेक ठिकाणी आणि मग जगभरात १७ देशांमध्ये ह्याचे प्रयोग झाले .असं कॅप्शन देत, १८ व्या वर्षांमध्ये पदार्पण करत असताना, सलील कुलकर्णी आणि संदीप खरे या जोडीने प्रेक्षकांसाठी हि भेट आणली आहे. त्याच सोबत या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रेक्षेपण अमेरिका, यूरोप आणि दुबई या देशांमध्ये सुद्धा होणार आहे.