प्रत्येक मराठी कलाकार हा त्याच्या आयुष्यामध्ये एकदा तरी, मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या जुन्या कलाकारांसोबत काम करण्याचं स्वप्न बघत असतो. काही कलाकारांची हि स्वप्ने पूर्ण सुद्धा होतात. तर काही कलाकार त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करत असतात. आणि याच कलाकारांपैकी एक कलाकार असा सुद्धा आहे,  ज्याचं हे स्वप्न पूर्ण सुद्धा झालं आणि त्याच्या साठी हा क्षण अविस्मरणीय सुद्धा राहिला. आणि कलाकार म्हणजे पॉवरपॅक सिद्धार्थ जाधव..

नुकतंच सिद्धार्थ जाधवने, त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मराठी चित्रपटसृष्टीमधील गाजलेले खलनायक आणि एक हाडाचा कलाकार ''स्वर्गीय निळू फुले'' यांच्या सोबतच फोटो शेअर केला आहे. एक कलाकार म्हणून माझ्या आयुष्यात असे खूप काही अविस्मरणीय क्षण आहेत जे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. त्यातलाच एक हा "स्वर्गीय निळूफुले" सरांबरोबर काम करण्याचा योग. असं कॅप्शन देत सिद्धार्थ जाधवने हा फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. गाव तसं चांगलं या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधवला निळू फुले संरासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं केलं. आज निळू पुळे यांच्या स्मृतिदिना निमित्त सिद्धार्थने हा फोटो शेअर करत त्यांना अभिवादन केले आहे. त्याच सोबत सिद्धार्थने चित्रपटाचे दिग्दर्शक महेश टिळेकर यांचे सुद्धा आभार मानले. एका कलाकार नेहमीच सगळ्यांचा ऋणी असतो मग त्यामध्ये त्यावर प्रेम करणारे प्रेक्षक असो किंवा जेष्ठ आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची मिळालेली संधी, आणि या पोस्ट द्वारे सिद्धार्थ जाधवने हेच पटवून दिले आहे. निळू फुले सरांवर असणार त्याच प्रेम आणि त्यांच्याकडून त्याला मिळालेली शिकवण यासगळ्या बद्दल आभार मानत सिद्धार्थ जाधवने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.