बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या बांदल सेनेने केलेल्या पराक्रमाची महान गाथा, आपल्याला जंगजौहर चित्रपटामध्ये बघता येणार आहे. आणि नुकतंच या चित्रपटाचा थरारक टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लेखक दिग्दर्शक दिग्गपाल लांजेकर यांच्या फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटानंतर, जंगजौहर हि त्यांची तिसरी कलाकृती आपल्या भेटीला आली आहे. 

आजच्या दिवशीचं बाजीप्रभू आणि त्यांच्या बांदल सेनेने, महाराजांना विशाळगडावर सुखरूप पोहचवून पावनखिंड अजरामर केली. आणि त्याच मावळ्यांना श्रद्धांजली देत, दिग्गपाल लांजेकरने हा टिझर आपल्यासमोर सादर केला आहे.चित्रपटाच्या टिझर मध्ये, आपल्याला चिन्मय मांडलेकर यांनी साकारलेल्या महाराजांची आणि मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेली आऊसाहेबांच्या भूमिकेची झलक दिसून येते. राजे विशाळगडावर पोहचल्यावर तोफांचे पाच बार द्या, तोवर या घोडखिंडीत अडवून ठेवतो, आणि  हट्टाला पेटतो त्यालाच मऱ्हाटा म्हणत्यात... अश्या दमदार डायलॉगची फटकेबाजी करत जंगजौहर चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. लेखक दिग्दर्शक दिग्गपाल लांजेकर यांच्या फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर, जंगजौहर हा चित्रपट सुद्धा आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करेल, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची एक नवीन बाजू आपल्या समोर मांडेल यामध्ये काही वाद नाही.