बॉलीवूडचे महानायक अभितेने अमिताभ बच्चन यांना सुद्धा व्हायरसची लागण झाली आहे.  आणि हि बातमी त्याच्या चाहत्यांसाठी खूपच निराशाजनक अशी होती. आणि त्यामुळेच  अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. सुरवातीला त्याच्या कुटुंबाकडून कोणतीच माहिती देण्यात आली न्हवती परंतु,  अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करुन त्यांना व्हायरसची लागण  झाल्याचं सांगितलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये, माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मला रुग्णालयामध्ये दाखल व्हावे लागणार आहे. मागील काही दिवसामध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे. अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटनंतर फक्त हिंदी चित्रपटसृष्टी नाही तर मराठी चित्रपटसृष्टीला सुद्धा धक्का बसला आहे. नुकतंच अमिताभ बच्चन यांचा गुलाबो - सिताबो हा चित्रपट सगळ्यांच्या भेटीला आला, आणि त्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी निभावलेला मिर्झा नवाब या भूमिकेची सगळ्यांनी खूप प्रशंसा केली. अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटनंतर साऱ्या कलाकारांनी आणि दिग्गजांनी प्रार्थना करत लवकर बरं व्हावं यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये आपले मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकार सुबोध भावे, केदार शिंदे आणि रितेश देशमुख यांचा सुद्धा समावेश आहे. आपल्या अभिनयाने सगळ्यांना भुरळ पाडणारे आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीमधे नावलौकिक कमावणारे अमिताभ बच्चन हे, या आजारातून बाहेर येऊन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करतील यामध्ये काहीच वाद नाही.