भोसले या वेबसिरीज मधून पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस आलेला मराठी अभिनेता संतोष जुवेकर याने त्याच्या आगामी चित्रपटाचे अजून एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. समित कक्कड यांचं दिग्दर्शन असलेला ३६ गुण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संतोष जुवेकरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या चित्रपटाचे अजून एक नवीन पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये आपण या चित्रपटामधील अभिनेत्रीला बघू शकतो.   या चित्रपटामध्ये संतोष सोबत अभिनेत्री पुर्वा पवार झळकणार असून पुष्कर श्रोत्री सुद्धा दिसणार आहे. या पोस्टरमध्ये पुर्वा दिसत आहे तर तिच्या मागे संतोष दिसत आहे.  ‘आपल्या घरात बसून बघा घरातली गोष्ट..... जे तुमचं तेच आमचं.’  कॅप्शन देत संतोषने हे पोस्टर शेअर केले आहे. ह्रिषीकेश कोळी याने या चित्रपटाचे संवादलेखन केले असून, चित्रपटाची पटकथा सुद्धा ह्रिषीकेश कोळी याने सांभाळली आहे. संतोष जुवेकरने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत जे कॅप्शन टाकले आहे, यावरून हा चित्रपट सुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज होण्याची शक्यता दिसून येते. नुकतंच संतोष जुवेकर आणि मनोज बाजपेयी यांचं भोसले हि वेबसिरीज सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आणि सगळीकडेच संतोषच्या कामाचे कौतुक सुद्धा केले जात आहे.