प्रत्येक मराठी कलाकार हा, त्याच्या करियरची सुरवात हि नाटकांपासूनच करतो. मग त्या नाटकांमध्ये बॅकस्टेज पासून ते स्पॉट बॉयची सगळी कामे करत अनेक मराठी कलाकार पुढे आले आहेत. आणि सगळ्यांच कलाकारांनी कधी ना कधी नाटकांमध्ये काम हे केलेच आहे. मग ते कॉलेजमधील एकांकिका असो किंवा व्यावसायिक नाटक साऱ्या कलाकारांची नाळ हि नाटक आणि रंगमंचासोबत जोडली गेली आहे. 

नुकतंच एका मराठी कलाकाराने, रंगमंचाची आणि नाटकाची आठवण आपल्यासोबत शेअर केली आहे.  आणि तो अभिनेता म्हणजे समीर खांडेकर, समीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर कलाकारांना जे काही मानधन मिळतं त्याच्या पाकिटाचा फोटो शेअर केला आहे. समीर खांडेकरने सुद्धा त्याच्या अभिनयातील करियरची सुरवात हि नाटकांमधूनच केली आहे. आणि हा फोटो शेअर करत त्याने त्याच्या रंगमंचावरील आठवणींना उजाळा दिला आहे. आज हे हाती लागलं. व्यावसायिक नाटक करणार-या बर-याच मित्रांना हे “पाकीट” जवळचं असेल. प्रयोग संपवून घरी आलो की हे आई कडे द्यायचो. मग, आई देव्हाऱ्यात ठेवायची. अनेक वर्ष हा रतिब सुरू होता. हळूहळू गोष्टी बदलत गेल्या. प्रयोगाच्या पाकीटावरून “per day” वर आलोय. असं कॅप्शन देत समीरने त्याच्या आठवणींना आपल्यासमोर घेऊन आला आहे. त्याच सोबत समीरने या फोटोद्वारे, त्याच्या वडिलांचे सुद्धा आभार व्यक्त केले आहे. कारण समीरला त्याच्या प्रयोगानंतर मिळणाऱ्या सगळ्या पाकिटांना समीरने नाही तर त्याच्या वडिलांनी जपून ठेवले होते, आणि म्हणूनच या कलेक्शनमध्ये त्याच्या पेक्षा  वडिलांचा हातभार असं सांगतो. प्रत्येक कलाकार हा एकदा तरी नाटकांमधून आपल्यासमोर आला आहे, आणि प्रत्येक कलाकाराची नाटक आणि रंगमंचाला घेऊन एक वेगळी आठवण सुद्धा आहे. सध्या समीर खांडेकर स्टार प्रवाह वाहिनीवरील वैजू नं. १ मध्ये मुख्य भूमिकेमधून आपल्या भेटीला येत असतो. आणि लवकरच वैजू नं.१ हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीला सुद्धा येणार आहे.