बिग बॉस सीजन १ मधून सगळ्यांच्या घरामध्ये पोहचलेली अभिनेत्री स्मिता गोंदकर नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. 'पप्पी दे पारुला' या गाण्यामधून स्मिताने तिचा एक वेगळा चाहता वर्ग बनवला होता. यावेळी सुद्धा स्मिता सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे, आणि तो विषय म्हणजे तिने केलेलं एक आगळं वेगळं फोटोशूट. 

स्मिता गोंदकर नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून, तिच्या चाहत्यांसोबत जोडलेली असते. प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्मिताने यावेळी सुद्धा एक भन्नाट आणि सामाजिक विषयाला अनुसरून असं फोटोशूट केलं आहे. गेले कित्येक दिवस अमेरिकेमध्ये रंगभेदाचा विषय नेहमीच चर्चेत राहीला आहे. आणि या विषयाचे पडसाद संपूर्ण जगामध्ये पडायला सुरवात झाली आहे. आणि याच विषयाला अनुसरून स्मिताने सावळ्या रंगाचा फोटोशूट केला आहे. ब्राउन इज ब्युटीफुल असं कॅप्शन देत स्मिताने तिच्या फोटोशूटचे, फोटोज इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. खूप असे यशस्वी माणसे आहेत जे विविध त्वचेच्या रंगांचे जरी असले तरीही त्यांनी आपल्यासमोर एक उत्तम उदाहरणं ठेवलं आहे. तेव्हा आपल्या त्वचेच्या रंगासोबत आनंदी राहुयात आणि तुमच्या त्वचेचा रंग तुमचं चारित्र्य ठरवू शकत नाही. असं कॅप्शन देत स्मिताने सगळ्यांसमोर एक उत्तम उदाहरण दिलं आहे. स्मिता गोंदकर तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोशूटमुळे नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहिली आहे. आणि आता ब्राउन इज ब्युटीफुल या फोटोशूट मुळे तर सारेजण तिच कौतुक करत आहेत.