गेले तीन महिने लॉकडाउनमुळे सारेजण आपल्या घरामध्येच बसून राहिले आहेत. बाहेर सुरु असणारी गंभीर परिस्थिती आणि त्यामुळे बंद झालेलं व्यवहार यामुळे सगळ्याचं माणसांना घरातून बाहेर निघायला बंदी करण्यात आली होती. पण आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यात आल्यापासून सारे व्यवहार हळू हळू सुरु करण्यात आले आहेत. आणि यामध्ये आपल्या सारखे, आपले मराठी कलाकार सुद्धा त्यांच्या घरामध्येच बसून होते, पण आता शूटिंगच्या निमित्ताने मराठी कलाकार सुद्धा आपले मनोरंजन करायला सज्ज झाले आहेत. 


गेले अनेक दिवस आपले लाडके कलाकार सुद्धा घरामध्येच बसून आहेत, आणि आपल्या प्रमाणेच त्यांना सुद्धा घराबाहेर जाण्याचा मोह झाला आहे. आणि याच  दरम्यान चला हवा येऊ द्या मधून आपल्या भेटीला आलेला, विनोदी वृत्तीने आपल्याला हसवत ठेवणारा कलाकार सागर कारंडे याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक विडिओ शेअर केला आहे. घरामध्ये बसून कंटाळलेला सागर त्याच्या बायकोसोबत पावसाचा आनंद घेण्यासाठी घर बाहेर निघाला आहे. सागर घराबाहेर जरी पडला असला तरी सुद्धा त्याला एक खंत वाटत आहे आणि ती म्हणजे, त्याला या पावसामध्ये भिजायला मिळत नाही आहे. सागर कारंडेच्या या विडिओला त्याच्या चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. आणि घराबाहेर निघताना सुद्धा सागरने स्वतःची काळजी घेत मास्कचा वापर केला आहे. हळू हळू सगळ्या मालिकांच्या शूटिंगला सुरवात झाली आहे. आणि लवकरच चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची शूटिंग सुद्धा सुरु होणार असून, पुन्हा एकदा सागर कारंडे आपल्याला हसवायला आणि आपले मनोरंजन करायला येईल यामध्येच काही वाद नाही.