माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधील सगळेच कलाकार आणि पात्र हि अव्वल दर्जाची आहेत. पण या साऱ्यांमध्ये एक भूमिका नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहिली आणि ती भूमिका म्हणजे शनायाची, राधिकाच्या नाकात दम करणारी आणि गुरुनाथला तिच्या तालावर नाचायला लावणाऱ्या या पात्राने सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा बनवली आहे. 


 मराठी अभिनेत्री रसिका सुनीलने, शनाया हि व्यक्तिरेखा खूप चांगल्या पद्धतीने गाजवली, आणि प्रेक्षकांनी सुद्धा या भूमिकेला त्यांची पसंती दाखवली. गुरुनाथला  स्वतःच्या प्रेमामध्ये ओढणारी आणि राधिकाला वेळोवेळी त्रास देणारी हि भूमिका रसिकाने उत्तम रित्या निभावली. परंतु गेल्या दीड वर्षांपासून रसिका सुनील फिल्ममेकिंगच्या शिक्षणासाठी बाहेरगावी असल्या कारणाने तिला या मालिकेमधून ब्रेक घ्यावा लागला. आणि रसिका सुनीलच्या जागेवर, ईशा केसकरने शनाया हि भूमिका साकारली. आणि खूप कमी वेळातच ईशाला तिच्या कामाची पोचपावती सुद्धा मिळाली. रसिका प्रमाणेच प्रेक्षकांनी ईशा केसकरवर सुद्धा भरपूर प्रेम केलं. शनाया या पात्राला साजेस काम करत ईशाने, रसिका सुनीलची जागा भरून काढली. परंतु आता फिल्म मेकिंगचे शिक्षण पूर्ण करत रसिका सुनील पुन्हा एकदा आपल्याला शनायाच्या भूमिकेत दिसणार आहे. आणि याच दरम्यान ईशा केसकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक विडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ईशाने शनायाच्या स्टाईलमध्ये, ती आता यापुढे शनाया हि व्यक्तिरेखा साकारणार नसून, प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि शाबासकी बद्दल त्यांचे धन्यवाद करत आहे. आणि या पुढे येणारी नवीन शनायाला तुम्ही तेवढंच प्रेम कराल असं सुद्धा सांगितलं आहे. ईशाच्या या विडिओवर रसिका सुनीलने कमेंट करत तिचे आभार मानले आहे. आता यानंतर पुन्हा एकदा आपल्याला शनायाच्या भूमिकेमध्ये रसिका सुनील दिसणार आहे. आणि तिच्या चाहत्यांसाठी हि एक आनंदाचीच बातमी असून पुन्हा एकदा रसिका प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाली आहे.