गेले काही दिवस मराठी कलाकार त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, OMT च्या संदर्भातले काही फोटो शेअर करून, त्याचा अर्थ विचारत होते. आणि आपल्या सगळ्यांना या OMT चा नेमका अर्थ काय हा समजला सुद्धा, 'Online माझं Theatre' हा त्याचा पूर्ण अर्थ असून, घरबसल्याच आपल्याला OMT वर सादर होणाऱ्या नाटकांची मजा अनुभवता येणार आहे.  

सुनील बर्वे यांच्या सुबक आणि Wide Wings Media मार्फत हा एक नवा कोरा आणि भन्नाट कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आले आहेत. आणि याच कार्यक्रमामध्ये मराठी अभिनेता शुभांकर तावडे याने, एक सुंदर असा माईम ऍक्ट सादर केला आहे. Online माझं Theatre च्या इंस्टाग्राम पेजवर टेलिव्हिजन कश्या पद्धतीने पुढे गेले, त्यामध्ये कसे बदल होत गेले, या संदर्भातला शुभांकारचा विडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर शुभांकरने सुद्धा त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा माईम अवतारामधला फोटो शेअर करत, एक शब्दही न बोलता बरेच काही सांगितले जाऊ शकते. हा कलाप्रकार माझ्या हृदयाशी नेहमीच सर्वात जवळचा आहे, कारण यामुळे माझ्यासाठी थिएटरचे एक वेगळेच जग उघडले.असं सुंदर कॅप्शन दिलं आहे. Online माझं Theatre द्वारे आपण घरबसल्या  अनेक नाटकांचा आनंद घेऊ शकतो. Online माझं Theatre मध्ये फक्त माईम ऍक्ट नाही तर, अजून खूप सारे वेगवेगळे नाटक प्रकारांची मज्जा आपल्याला घेता येणार आहे. आणि यामध्ये शुभांकर तावडे सोबत संकर्षण कऱ्हाडे, मिलिंद पाठक, भार्गवी चिरमुले, शुभांकर तावडे, आरोह वेलणकर, ऋतुजा बागवे, अलका कुबल यांसारख्या अनेक कलाकारांचा सुद्धा समावेश असणार आहे.