संपूर्ण बॉलीवूडला आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या, अनेक कलाकारांना नृत्य शिकवणाऱ्या, नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचं कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झालं. मागील काही दिवसांपासून सरोजजी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होत आणि यादरम्यान त्यांची करोना चाचणीसुध्दा करण्यात आली. ज्याचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला होता. आणि आज सकाळी वयवर्षे ७२ असताना, बॉलीवूड मधील महान नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन झालं. 


संपूर्ण बॉलीवूडला आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या, ऐश्वर्या राय, संजय दत्त, माधुरी दीक्षित नेने, उर्मिला मातोंडकर, श्रीदेवी, अक्षय कुमार, कंगना राणोत, काजोल, शाहरुख खान  ते आताच्या आलिया भट्ट, वरून धवन यासगळ्यांना नृत्य शिकवत सरोज खान यांनी अनेक गाण्यांना त्याच्या डान्सने लोकांच्या पसंतीस उतरवले. तेजाब मधील एक दोन तीन, हमको आज कल है इंतजार, चोली के पिछे क्या है.., निंबुडा निंबुडा, डोला रे डोला,  हवा हवाई, ये काली काली आँखे यांसारख्या गाण्यांचं दिग्दर्शन करत सरोज खान यांनी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक वेगळीच जागा बनवली आहे. बॅकग्राऊंड डान्सर ते नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांनी एकूणच २०००  गाण्यांसाठी नृत्यदिग्दर्शनाचं काम सांभाळलं होतं आणि याच पोचपावती म्हणून  ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सुद्धा सन्मानितही करण्यात आलं होतं. सरोज खान यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोकाकुल पसरली आहे. आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माधुरी दीक्षित नेने सोबत उर्मिला मातोंडकर, अक्षय कुमार यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सरोज खानसोबतचे फोटो पोस्ट करत, त्यांच्या आठवणी आपल्यासोबत शेअर केल्या आहेत.