नुकतंच महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार लॉकडाऊनमध्ये थोड्या प्रमाणात शिथिलता करण्यात आली आहे. आणि सोशल डिस्टिंगचे पालन करत, पुन्हा एकदा मालिका आणि चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी दिली असून, याच पार्शवभूमी वर मालिका आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात झाली आहे. मग त्यामध्ये मराठी वाहिनी वरील मालिकांच शूटिंग असो,  चित्रपटांच्या पोस्ट प्रोडक्शनची काम सुद्धा सुरु करण्यात आली आहे. 

नुकतंच चित्रपट दिग्दर्शक विशाल फुरीया यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर, त्यांचा बळी या चित्रपटाच्या डबिंगला सुरवात झाल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. लपाछपी सारख्या गाजलेल्या चित्रपटानंतर विशाल फुरीया यांचा बळी हा चित्रपट आपल्या भेटीला येणार होता. परंतु गेले तीन महिने संपूर्ण महाराष्ट्रभर लॉकडाऊन असल्यामुळे चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम बाकी राहिले होते. महाराष्ट्र सरकारच्या नियमांचे पालन करत, बळी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका निभावणार साकारणारा अभिनेता स्वप्नील जोशी याने त्याच्या डबिंगच्या कामाला सुरवात केली आहे. लपाछपी नंतर विशाल फुरीया पुन्हा एकदा एक हॉररपॅट आपल्या समोर सादर करणार आहेत. पोस्ट प्रोडक्शनचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच बळी हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. आणि हा चित्रपट सुद्धा लपाछपी सारखाच रोमांचक असेल का हे पाहण्यात खरी रंगत येणार आहे.