दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी हि खूप जोमात आणि उत्साहात साजरी केली जाते. एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये भजन, अभंग आणि भारुडांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि याच गाण्यांचा आनंद महाराष्ट्रामधील अनेक रसिकांना घेता येतो. पण यावर्षी कोरोनामुळे पंढरपूरच्या वारी प्रमाणे इतर कार्यक्रमांवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. पण यावर्षी मात्र अनेक मराठी गायकांनी प्रेक्षकां घरबसल्या आषाढी एकादशीच्या गाण्यांचा उपभोग कश्या पद्धतीने घेता येईल यावर लक्ष दिल आहे. 


प्रसिद्ध शास्त्रीय गायक/ संगीतकार महेश काळे याने, आषाढी एकादशीनिमित्त सादर होणाऱ्या कार्यक्रमामधील एक गाणं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलं आहे. शास्त्रीय संगीत, भजन, भारूड यामध्ये कुशाग्र असणाऱ्या महेश काळेने या यावेळी हिंदी / उर्दू भाषेमध्ये विठ्ठला हे गाणं आपल्यासमोर सादर केलं आहे. नेहमीच मराठी मधून गाणं सादर करणाऱ्या महेश काळेने, यावेळी मराठी भाषेच्या चौकडीबाहेर जाऊन उर्दू भाषेमध्ये हे  गीत आपल्या समोर आणले आहे. ये जमीं है तेरी, आसमाँ है तेरा, तेरा हैं ये जहाँ... विठ्ठला असे या गाण्याचे बोल असून, वैभव जोशी यांनी हे  गाणे लिहिले आहे, आणि नरेंद्र भिडे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. विठ्ठला या उर्दू गाण्याचे अजून एक वैशिष्ठ म्हणजे, गाण्यामध्ये ज्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला आहे, ती सगळी छायाचित्रे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मा. उद्धव ठाकरे यांनी टिपले आहेत. महेश काळे याने नेहमीपेक्षा जरा वेगळ्यापद्धतीने हे गाणं आपल्या समोर सादर जरी केलं आहे, पण तरी सुद्धा त्यांच्या या प्रयत्नाला प्रेक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने पसंती दाखवली आहे.