सैराट पासून आपल्या सगळ्यांच्या मनात घर करणारा अभिनेता आकाश ठोसर आज सुद्धा यशाच्या अनेक पायऱ्या चढत आहे. मग त्यामध्ये वेबसिरीज असो किंवा अजून कोणता प्रोजेक्ट आकाश नेहमीचं आपलं मन जिंकत आला आहे. सध्या तरी आकाशला सुद्धा सगळयांप्रमाणे घरामध्ये बसावं लागलं असलं तरी, आकाश सोशल मिडीया मार्फत आपल्या चाहत्यांसोबत जोडलेला आहे. कधी फिटनेस तर कधी ट्रेकिंगचे फोटो शेअर करत आकाश आपल्या फॅन्स सोबत खूप वेळ घालवतो. 

सध्या याच सोशल मिडियामुळे आकाश ठोसर चर्चेचा विषय बनला आहे. आपल्या फोटोशूट मुळे आकाश नेहमीच तरुणींना घायाळ करत असतो. आणि नुकतंच आकाशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, आहे का कुणी अशी? असेल तर सांगा!! असं भन्नाट कॅप्शन देत स्त्री वेशातील फोटो शेअर केले आहेत. फेस अँपचा वापर करत आकाशने त्याचेच फोटो आपल्या समोर शेअर केले आहेत. आकाश दिसायला जेवढा हँडसम आहे, तेवढेच सुंदर त्याचे स्त्री वेशातील फोटोज सुद्धा आहेत. आणि खूप कमी वेळातच आकाश ठोसरच्या या फोटोज ला प्रेक्षकांनी त्यांची पसंती दर्शवत, लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुद्धा केला आहे. सोशल मिडीयाचा वापर करत, आकाश त्याच्या चाहत्यांसोबत खूप चांगल्या पद्धतीने जोडला गेला आहे. आणि आताच्या या फोटोज मुळे सुद्धा आकाश पुन्हा एकदा सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे.