तब्बल तीन महिन्यांनंतर लॉकडाऊन मध्ये शिथिलता झाल्यानंतर सगळ्या मालिकांच्या चित्रीकरणाला सुरवात झाली आहे. आणि लवकरच प्रेक्षकांना आपल्या आवडत्या मालिकांचे नवीन एपिसोड बघायला मिळणार आहेत. आणि यामध्ये सगळ्या मराठी वाहिनींचा  समावेश आहे. कलर्स मराठी, झी मराठी, स्टार प्रवाह सगळ्या वाहिनींवर काम करणारे कलाकार नव्या दमाने, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आणि याच अनलॉकच्या नियमांचे पालन करत सोनी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेच्या शूटिंगचा श्रीगणेशा झाला आहे.   
     
शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊंचे आधीचे आयुष्य कसे होते, आणि त्या स्वराज्याच्या जिजामाता कश्या झाल्या, हा सारा प्रवास आपण सोनी मराठी वाहिनी वरील 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेमधून बघत आले आहोत. पण गेल्या काही महिन्यायांपासून लॉकडाऊन मुळे, इतर मालिकांप्रमाने या मालिकेचे सुद्धा शूटिंग थांबले होते. आणि परिणामी आपल्याला स्वराज्यजननी जिजामाता मालिकेचे रिपीट एपिसोड बघायला मिळत होते. पण अनलॉक मुळे प्रेक्षकांच्या आवडीचा कार्यक्रम 'स्वराज्यजननी जिजामाता' च्या शूटिंगला सुद्धा सुरवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करत,  सोशल डिस्टिंगचे भान राखत या मालिकेच्या शूटिंगला सुरवात झाली असून  लवकरच आपल्याला 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेचे नवीन एपिसोड बघायला मिळणार आहेत.