मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने आणि आता दिग्दर्शन क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या नावाचा डंका वाजवणारा अभिनेता प्रसाद ओक नेहमीच आपल्या समोर काही तरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो.  मग त्यामध्ये हिरकणी सारखा दिग्दर्शित केलेला चित्रपट असो किंवा धुरळा चित्रपटामधील हरीशभाऊ गाढवे हि भूमिका यासगळ्या मधून प्रसाद नेहमीच स्वतःला सिद्ध करत असतो. आपल्यासमोर जरी प्रसाद एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून जरी समोर आला असेल, पण त्याव्यतिरिक्त प्रसाद एक वडील म्हणून सुद्धा दरवेळेला स्वतःला सिद्ध करत असतो. 

नुकतंच फादर्स डे च्या निमित्ताने, प्रसाद एक बाप म्हणून कसा आहे ? याबद्दल त्याच आभार मानत,  मंजिरी ओक म्हणजेच प्रसादच्या बायकोने त्याच्या साठी एक भावनिक पोस्ट लिहली आहे. मंजिरीने हि पोस्ट तिच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये मंजिरीने त्याचे आभार मानत एक छोटासा संदेश प्रसादला दिला आहे. चित्रपटाचे शूटिंग आणि त्याच्या सोबत असणारी कामे या सगळ्यांमुळे प्रसाद ओक नेहमी घर बाहेर असतो. त्याला त्यांच्या मुलांबरोबर पाहिजे तसा वेळ मिळाला नसला तरी, एक मित्र म्हणून प्रसाद नेहमी त्यांच्या मुलांसोबत असतो. एक आदर्श पिता कसा असतो आणि एक जवाबदार माणूस बनण्यासाठी काय केलं पाहिजे याबाबद्दलचे धडे तो नेहमी त्याच्या मुलांना देत असतो. आणि प्रसादच्या याचं गुणांमुळें तो एक "बाप FATHER" आहे. असं मंजिरीने या पोस्ट मध्ये लिहिले आहे. कामाच्या निमिताने जरी प्रसाद बाहेर असला तरी, त्याला जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा त्याचा संपूर्ण वेळ हा त्याच्या मुलांना देतो. याबद्दल मंजिरीने त्याचे आभार मानले आहे. मंजिरीच्या या भावनिक पोस्टवर खूप कमी वेळात लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव झाला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसाद ओकने सुद्धा मंजिरीच्या या पोस्ट वर कमेंट करत तिचे सुद्धा, प्रत्येक यशस्वी "बापा"मागे एक "आई" असतेच.. असं लिहीत मंजिरीचे आभार मानले आहे.