गेले तीन महिने आपण सारेजण कोरोना सारख्या संकटाला तोंड देत आहोत. आणि याच पार्शवभूमीवर सगळे व्यवहार, सगळे ऑफिससेस, आणि अनेक मोठ्या इंडस्ट्री बंद झाल्या आहेत. आणि यामध्ये मराठी आणि हिंदी चित्रपट/ मालिका या इंडस्ट्रीचा सुद्धा समावेश आहे. आणि यामुळेच अनेक चित्रपटांचे आणि मालिकांचे  शूटिंग हे बंद झाले होते. पण नुकतंच महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार लॉकडाऊनमध्ये थोड्या प्रमाणात शिथिलता करण्यात आली आहे. आणि सोशल डिस्टिंगचे पालन करत, पुन्हा एकदा मालिका आणि चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी दिली आहे.

गेले तीन महिने बंद असलेलं शूटिंग पुन्हा एकदा सुरु होत असल्याने, कलाकारांसोबत सगळ्यांनी महाराष्ट्र्र सरकारच्या या नियमाचे स्वागत करत, आणि सारेजण पुन्हा एकदा नव्याने काम करायला सज्ज झाले आहेत. याच दरम्यान गायक / दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या इंस्टग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांचा येणार पुढील चित्रपट एकदा काय झाले, याच्या पोस्ट प्रोडक्शन मधील डबिंगचे काम सुरु झाल्याची माहिती आपल्या सगळ्यांना दिली आहे. वेडींगचा शिनेमा या चित्रपटनानंतर डॉ. सलील कुलकर्णी यांचा, एकदा काय झाले हा चित्रपट आपल्या भेटीला येणार होता परंतु लॉकडाऊनमुळे या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम बाकी होते. अनलॉकमुळे आणि महाराष्ट्र सरकारच्या नियमामुळे आता अनेक मालिका आणि चित्रपटांची शूटिंग पुन्हा एकदा सुरु होणार असून लवकरचं सगळ्या प्रेक्षकांना नवीन चित्रपट आणि मालिकांचा आनंद घेता येणार आहे.