मराठी बिग बॉस सीजन १ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत, खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत नेहमीच तिच्या अभिनय कौशल्याने आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करत असते. सध्या शर्मिष्ठा राऊत अजून एका गोष्टीमुळे सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. आणि ते म्हणजे नुकतंच शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा साखरपुडा पार पडला. 

   शर्मिष्ठाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक कविता शेअर करत, तेजस आणि तिच्या साखरपुड्याबद्दलची माहिती तिच्या चाहत्यानां दिली. आणि २१ जून रोजी क्वारंटाईन नियमांचे पालन करत शर्मिष्ठा आणि तेजस देसाईं या दोघांचा साखरपुडा संपन्न झाला. शर्मिष्ठा आणि तेजसने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोघांच्या सारखपुड्याचे फोटो शेअर केले आहे.  खूप कमी वेळातच या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांपासून सगळ्या मराठी कलाकारांनी पसंती दर्शवली आहे. सुखांच्या सरीने हे मन बावरे या लोकप्रिय मालिकेमधून संयोगिता हि भूमिका साकारत शर्मिष्ठा राऊत आपले मनोरंजन करत असतेच, आणि सध्या साखरपुड्याच्या बातमीमुळे सुद्धा शर्मिष्ठा सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे.