निसर्गाच्या कुशीत मध्ये दडलेल कोंकण हे सगळयांसाठी एक पर्वणी असून समस्त महाराष्ट्राला मिळालेली एक सुंदर भेटवस्तू आहे. पण गेल्या आठवड्यामध्ये या कोंकणने निसर्गाचे भयाण रूप बघितले. निसर्ग वादळामुळे संपूर्ण कोंकण आणि कोंकणवासियांना खूप मोठा धक्का लागला आहे. संपूर्ण कोंकण किनारपट्टीला या वादळाचा धक्का बसला आहे. आणि याच कोंकणला पुन्हा उभं करण्यासाठी सारेजन आपल्या परीने प्रयत्न करत आहे. 

आणि याच प्रयत्नामध्ये सिनेदिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी सुद्धा त्यांचा हातभार लावला आहे. श्रीवर्धन, अलिबाग, दिवेआगर, या भागांमध्ये निसर्ग वादळामुळे खूप नुकसान झाले आहे. गावामध्ये राहणाऱ्या अनेकांची घरे, शेती, नारळ सुपारीच्या बागा हे सार काही उद्वस्त झालं आहे. आणि या बद्दलची एक चित्रफिती राजेश मापुस्कर यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. ज्यामध्ये निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानासाठी साऱ्यांनी पुढाकार घेत, त्यांना मदत करण्याचे आव्हान दिले आहे. राजेश मापुस्कर यांनी शेअर केलेल्या या चित्रफितीमध्ये जितेंद्र जोशी यांनी स्वतः लिहलेली कविता सादर केली आहे. याच सोबत जितेंद्र जोशीने या चित्रफितीमध्ये आवाज देत, मदतीसाठी आव्हान केले आहे. गरिमा फाउंडेशन आणि लायन्स क्लबच्या मार्फत निसर्ग वादळामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजेश मापुस्करने या व्हिडिओ मार्फत पुढे येत सगळ्यांना मदतीचं आव्हान केलं आहे.