आपल्या अभिनयामधून, विनोदाचं अस्सल टायमिंग आणि त्याच्या जोडीला खान्देशी भाषेचा ठसका असं परिपूर्ण पॅकेज असलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. नेहमीच आपल्याकडून प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याच्या तयारीत असणारा हा अभिनेता, दरवेळेला स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने सिद्ध करत असतो. आणि अभिनयाने सुद्धा साऱ्या प्रेक्षकांना चकित करून सोडतो. संकर्षण एक उत्तम अभिनेता तर आहेच, पण याच जोडीला तो एक खूप चांगला कवी सुद्धा आहे. आणि याबद्दलची ग्वाही तो दरवेळेला त्याच्या चाहत्यांना देत असतो. 

नुकतंच संकर्षणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर, त्याने लिहेलेली एक कविता शेअर केली आहे. ज्यामध्ये आज आपला भारत देश कोरोना, निसर्ग वादळ, आणि  आर्थिक मंदी यांसारख्या संकटाना तोंड देत सुद्धा कश्या पद्धतीने उभा आहे, याच कौतुक करत आहे. सध्या आपल्या समोर अनेक संकटे उभी आहेत, पण या सगळ्या संकटाना तोंड देत आपले राष्ट्र पुन्हा एका उभे राहील याची, खात्री संकर्षणला आहे आणि याच विषयावर संकर्षने हि कविता केली आहे. 'ये राष्ट्र पुन: खडा होगा'... असे कवितेचे बोल असून, नेहमीप्रमाणे मराठी मधून कविता न करता, यावेळी हिंदीमधून आपले मनोगत व्यक्त केले आहे. संकर्षणाच्या कविता दरवेळेला प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. आणि आताच्या परिस्थितीमधील हि कविता सुद्धा सगळ्या प्रेक्षकांना विचार करायला लावणारी अशीच आहे. संकर्षणच्या कवितेचे शब्द जेवढे कणखर असे आहेत, तेवढ्याच जोशात संकर्षणे हि कविता आपल्या समोर सादर केली आहे. उत्तम अभिनय, विनोदाचं टायमिंग आणि मराठी भाषेवर असलेली जबर पकड यासाऱ्यामुळे संकर्षण नेहमीच आपल्यासमोर एका वेगळ्या ढंगात येतो. आणि त्याच्या लेखणीमधील हि कविता सुद्धा तेवढीच निराळी आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणारी अशी आहे.