पहिल्या पावसाच्या आगमनाने  सारेजण  सुखावले असताना येरे येरे पावसा या आगामी चित्रपटासाठी सुद्धा यंदाचा पाऊस खास ठरला आहे. हॉलीवूड नॉर्थ फिल्म अवॉर्ड्स २०२० (HNFA) या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात येरे येरे पावसा या मराठी चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. नुकत्याच  झालेल्या ऑनलाइन पुरस्कार सोहळ्यात ही  घोषणा करण्यात आली. या वर्षावात 'येरे येरे पावसा'ची संपूर्ण टीम आनंदाने न्हाऊन निघाली आहे.

पाऊस आणि पर्यावरणावर भाष्य करणाऱ्या ह्या चित्रपटाने थेट बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा रोवला आहे.आणि खास जागतिक पर्यावरण दिनाच्या निम्मिताने या बातमीने सोशल मीडियावर हवा केली 

हॉलीवूड नॉर्थ फिल्म अवॉर्ड्स २०२० (HNFA) या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म या पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, पटकथा, सहाय्यक अभिनेता, संकलन आणि साउंड डिझायनिंग या विभागासाठी या चित्रपटाला पुरस्कार मिळाले आहेत. 'हॉलीवूड नॉर्थ फिल्म अवॉर्ड्स २०२०' या आंतरराष्ट्रीय महोत्सवात १३ नामांकने मिळवलेल्या या चित्रपटाने तब्बल ६ पुरस्कार पटकावित बाजी मारली आहे.येरे येरे पावसा या चित्रपटाच्या दिगदर्शिका शफक खान यांनी या पुरस्कारांबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पावसाची धमाल आणि लहानांची कमाल दाखवणारा हा चित्रपट नकळत एक मोलाचा संदेश देऊन जातो. पावसाचं आगमन जसं प्रत्येकाला सुखावणार असतं तसा हा चित्रपटही प्रत्येकाच्या मनाला एक वेगळी उभारी देणारा असेल असा विश्वास दिग्दर्शिका शफक खान व्यक्त करतात.

‘एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी’ यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शफक खान यांनी केले आहे. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी योगेश एम.कोळी यांनी सांभाळली असून संकलन चंदन अरोरा यांनी केले आहे. कथा भूषण दळवी तर पटकथा शफक खान, भूषण दळवी यांची आहे. संवाद अभिषेक करगुटकर, विनोद जाधव यांनी लिहिले आहेत. अमोल पोवळे यांनी लिहिलेल्या गीतांना सुशांत पवार, किशोर पवार यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. साऊंड चाकीर हुसैन तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती be शारीक खान तर सहनिर्मिती अँन्या झँग (बटरफ्लाय फिल्म्स) यांची आहे. सत्या शेट्टी, ग्यानचंद चौहान, सुमेध गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत.