सध्या लॉकडाऊनचा चौथा आठवडा सुरु आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यापासून सारे व्यवहार, आय टि क्षेत्र, मंनोरंजन क्षेत्र हे सार काही बंद झाले आहेत. आणि याचा जबर मनोरंजन क्षेत्राला सुद्धा लागला आहे. नेहमी सुरु असणारी हि मनोरंजन इंडस्ट्री या लॉकडाऊनमुळे पूर्णपणे ठप्प  झाली आहे. आणि  यावर अवलंबून असणारे सारे कामगार सुद्धा आपल्या घरामध्ये बंद झाले आहेत. हातावर पोट असणारी या क्षेत्रातली मंडळी क्षणार्धात उध्वस्त झाली. कारण मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ, स्पॉट बॉय हे सारेजण कोरोनामुळे हतबल झाले आहेत. कधी न बंद होणारी हि इंडस्ट्री, सध्या पूर्णपणे  बंद झाली आहे.

कोरोनासारख्या संकटासमोर मनोरंजन क्षेत्राला हार मानायला भाग पाडलं आहे. पण या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपले मराठी कलाकार, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी तयार असतात. काही कलाकार सोशल मीडियामार्फत लाईव्ह येत, त्याच्या चाहत्यांसोबत संवाद साधत आहेत. तर काही कलाकार घरामध्येच राहून स्वतःला फिट कसे ठेऊ शकतात, आणि कोरोनाविरुद्ध जनजागृती करत आहेत. नुकतंच समीर चौघुलेने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भन्नाट कविता शेअर केली आहे. पुन्हा सगळं ठीक होईल, असे या कवितेचे बोल असून मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टी मध्ये काम करणारे सारे कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते यासाऱ्यानी, प्रेक्षकांना आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना दिलासा देत हि कविता सादर केली आहे. अतुल परचुरे, सुप्रिया पाठारे, प्रसाद ओक, वंदना गुप्ते, मनवा नाईक, पुष्कर श्रोत्री, रंगा गोडबोले, विशाखा सुभेदार यांसारख्या कलाकारांनी एकत्र येत हि कविता आपल्या समोर सादर केली आहे. लॉकडाऊनमुळे सगळ्यात आधी बंद झालेली मनोरंजन इंडस्ट्री पुन्हा एकदा सुरु होईल असा विश्वास दाखवत हि सकारात्मक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर सुरु आहे. जयंत पवार यांचं हे लेखन असून, कलाकारा पासून सारेजण मालिकांच्या शूटिंग साठी कश्या पद्धतीने सज्ज आहेत, याच उत्तम उदाहरण आपल्याला या कवितेमधून मिळालं आहे.