चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमामधून आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घर करणाऱ्या कुशल बद्रिके या कलाकाराची बात काही न्यारीच आहे. विनोदाचा अचूक टायमिंग, अभिनयाची उत्तम जाण आणि चला हवा येऊ द्या मधून नेहमी आपल्यासमोर काही तरी नवीन सादर करत, कुशलने साऱ्यांची मने जिंकली आहेत. मग त्यामध्ये त्याचं संजय जाधव बनून सगळ्या प्रेक्षकांना हसवणं असुदे किंवा रजनीकांत बनून प्रेक्षकांना थक्क करणं असुदे, या साऱ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने कुशल आपल्या समोर सादर करतो. पण या बद्रिके कुटुंबामध्ये फक्त कुशलच नाही, तर त्याची पत्नी सुद्धा एका कलाकारा पेक्षा कमी नाही आहे. 

सुनैना बद्रिके, हि एक उत्तम कथक नृत्यांगना आहे. ज्याप्रमाणे कुशल त्याच्या चाहत्यांना त्याच्या विनोदवृत्तीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. त्याच्या प्रमाणे सुनैना  देखील तिच्या कथकद्वारे नृत्यप्रेमींच मंनोरंजन करत असते. नुकतंच सुनैनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सध्या सगळ्या तरुणाईच्या चर्चेचा विषय असलेली वेब सिरीज मनी हाईस्ट, या सिरीजच्या Bella Cio या गाण्यावर कथक करत आहे. एका बाजूला कथक सारखा भारतीय नृत्य प्रकार आणि Bella Cio हे स्पॅनिश गाणं या दोघांचा उत्तम मेळ बसवून सुनैनाने हे कथक नृत्य सादर केले आहे. कथक हि सुनैनाची फक्त आवडच नाही तर, ती कथकचे  वर्कशॉप सुद्धा घेते. एका कलाकाराची पत्नी म्हणून वावरत असताना, सुनैना नेहमीच कुशल सोबत उभी असते. आणि त्याच्या सोबत कथकची आवड सुद्धा जोपासत आहे. फक्त कथक व्हिडिओ मधून नाही तर, कुशलच्या अनेक गमतीशीर व्हिडिओ मधून सुनैना आपल्या समोर आली आहे. आणि कुशल सारखीच त्यांची बद्रिके फॅमिली सुद्धा तेवढीच कल्लाकार अशी आहे.