मराठी मालिका आणि नाटक सृष्टीमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री अमृता सुभाष सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. गल्ली बॉय या चित्रपटासाठी फिल्मफेअर हा पुरस्कार मिळवून अमृता सुभाषने, पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची ओळख हिंदी चित्रपटसृष्टीला करून दिली. अनेक मराठी हिंदी वेबसिरीज मधून सुद्धा अमृता सुभाष आपल्या समोर आली ज्यामध्ये आपण आवर्जून सेक्रेड गेम्स या हिंदी वेब सिरीजच नाव घेऊ शकतो. 

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सारे मराठी कलाकार आपल्यासमोर काही तरी नवीन घेऊन येत आहेत. मग त्यामध्ये कलाकारांनी स्वतः लिहिलेल्या कविता असो किंवा घरामध्ये राहून प्रेक्षकांना दिलेले फिटनेसचे फंडे, या साऱ्या मधून मराठी कलाकार आपले मनोरंजन करत आहेत. आणि याच दरम्यान अमृता सुभाषने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. Life is Daily Soap, असं कॅप्शन देत या व्हिडिओमध्ये आपले आयुष्य एखाद्या Daily Soap प्रमाणे आहे. रोज काही तरी नवीन आणि काही तरी अनोखं घडत असत. अमृताने तिच्या एक उलट, एक सुलट या मराठी पुस्तकामधून एका विषयाचं हिंदी मध्ये भाषांतर करून या व्हिडिओ द्वारे तिचं मत मांडलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टी मधील इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन कलावंतांना स्मरून अमृता सुभाषने या लेखाचे हिंदी मध्ये वाचन केले आहे. Daily Soap प्रमाणेच आपल्याला खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा चालत राहावं लागत. याची जाणीव अमृता सुभाषने तिच्या चाहत्यांना करून दिली आहे. 


किल्ला, झोका, विहीर, हापूस, झिपऱ्या यांसारख्या मराठी तर, रमन राघव, गल्ली बॉय, सेक्रेड गेम्स, यांसारख्या हिंदी चित्रपट आणि वेब सिरींजमधून अमृता  सुभाष नेहमीच आपल्या अभिनयायाने सगळ्यांना चकित करून सोडते. आणि हीच अस्सल मराठी अभिनेत्री या नंतर सुद्धा तिच्या अभिनयाने आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करेल यात काही वाद नाही.