झी मराठी वाहिनीवरील, सा रे ग म  प या मालिकेने सगळ्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. नेहमी काही तरी नवीन सादर करत असताना झी मराठी वाहिनी आपल्यासमोर हा कार्यक्रम  घेऊन आली. आणि या कार्यक्रमामधील लिटिल चॅम्प हे पर्व खूप चांगल्या पद्धतीने गाजले. आणि त्यापेक्षा  जास्त गाजले या पर्वा मधील पंचरत्न म्हणजेच, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत या गायकांनी त्यांच्या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेडं लावलं. आणि आज सुद्धा हे गायक त्यांच्या गाण्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करत आहे.

झी मराठी वरील सा रे ग म  प या कार्यक्रमाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि याच  रौप्य महोत्सवी वर्षाचे अवचित्य साधून पुन्हा एकदा या गायकांच्या, गाण्याचा आस्वाद आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. सा रे ग म  प या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दाखवली आणि याचमुळे २५ वर्षाचा पल्ला या कार्यक्रमाने सर केला. प्रेक्षकांच्या याच प्रेमाखातर झी मराठी घेऊन येत आहे, एक देश - एक राग हा कॉन्सर्ट. यामधून आपण पुन्हा एकदा  लिटिल चॅम्प या पर्वामधील पंचरत्न म्हणेजच मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत यांच्या गाण्यांचा आनंद घेणार आहोत. त्याच सोबत या कार्यक्रमामध्ये आपण सेलिब्रिटी पर्वामधील प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, अमृता सुभाष, प्रिया बापट, रेणुका शहाणे, आणि सुनीत राघवन यांचे देखील धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि याच सोबत आपण बेला शेंडे, स्वानंद किरकिरे, सलील कुलकर्णी, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत या गायकांच्या गाण्याचा आस्वाद मिळणार आहे. एक देश - एक राग या कॉन्सर्ट मधून आपल्याला फक्त गाणी नाही तर, २५ वर्षांमधील आठवणी, रंजक किस्से या साऱ्यांचा अनुभव घेता येणार आहे. येत्या २४ तारखेला हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार असून नव्या जुन्या गाण्यांचा आस्वाद आपल्याला घेता येणार आहे.