मराठी चित्रपटसृष्टीमधील एक अशी अभिनेत्री जिच्या सौंदर्याने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडली. जिच्या अभिनयाच कौतुक फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा होत आहे.आपल्या नृत्याने, आपल्या अदाकारीने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री म्हणजेच महाराष्ट्राची लाडकी अप्सरा, सोनाली कुलकर्णी. 

नटरंग चित्रपटातुन अप्सरा म्हणून आपल्या समोर आलेल्या या अभिनेत्रीने खूप कमी वेळातच सगळ्यांची मने जिंकली. तिच्या सौंदर्यामुळे, तिच्या अभिनयामुळे सोनाली कुलकर्णी नेहमीच सगळ्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. आपल्या अभिनयामधून नेहमीच काही तरी वेगळं देण्याच्या प्रयत्नामध्ये असणारी सोनाली नेहमीच आपल्या समोर काई तरी नवीन सादर करते. आणि तिचा हा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या प्रेक्षकांच्या पसंतीस सुद्धा पडतो. सध्या लॉकडाउनच्या काळात सुद्धा सोनाली तिच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज वरून तिच्या चाहत्यांसमोर काही तरी नवीन घेऊन येत असते. आणि याच दरम्यान सोनाली कुलकर्णीने  तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे आणि ती म्हणजे, सोनालीने तिच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर तिच्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. सोनालीच्या वाढदिवसानिमित्त तिने तिच्या साखरपुड्याची बातमी सगळ्या प्रेक्षकांना दिली. २ फेब्रुवारी २०२० ला सोनालीचा, कुणाल बेनोडेकर सोबत साखरपुडा संपन्न झाला. दुबई इथे या दोघांचा साखरपुडा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत संपन्न झाला. 
 मराठी चित्रपटसृष्टी मधील सौंदर्यवती सोनाली कुलकर्णीने केलेला साखरपुडा हि बातमी तिच्या चाहात्यांसोबत संपूर्ण चित्रपटसृष्टी साठी आनंदाची बातमी ठरली आहे  एवढं मात्र नक्की..