सध्या लॉकडाऊन मुळे आपल्याच सारखे, सारे मराठी कलाकार सुद्धा त्याच्या त्याच्या घरी बंदिस्त झाले आहेत. पण कोरोना सारखी भयानक परिस्थिति जरी आपल्या समोर असली तरी सुद्धा, मराठी कलाकार मात्र आपलं मनोरंजन करण्यासाठी नवीन नवीन प्रयोग करत आहे. मग त्यामध्ये सोशल मीडिया साईट वरून लाईव्ह येत, प्रेक्षकांसोबत गप्पा मारणं असुदे किंवा घरामध्येच राहून कोरोना विरुद्ध जनजागृती करणं  असुदे, सारेजण त्याच्या परीने आपले मनोरंजन करत आहेत. 

याच दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीमधील एक गुणी कलाकार, सुबोध भावेने मात्र प्रेक्षकांसोबत साऱ्यांचे मनोरंजन करण्यासाठी एक वेगळीच आणि मजेशीर अशी शक्कल लढवली आहे. आणि ते म्हणजे सुबोधने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर Guess The Song हा Quiz Game सुरु केला आहे. काही चित्र घेऊन त्यांना एकाच फ्रेम मध्ये लावून, चाहत्यांना गाण्याचे बोल ओळखायला सांगितले आहे. मग त्यामध्ये दोन घडींचा डाव, याला जीवन ऐसें नाव, अमृताहूनी गोड नाव तुझे देवा यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे. आणि सुबोधच्या या Quiz ला सगळ्या प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.  घरामध्ये राहून आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत सुबोध आपल्यासमोर #सुबोध दादाची गोष्ट मधून भेटीला येतंच असतो. पण यावेळी मात्र काही तरी वेगळं आणि मजेशीर असं घेऊन येत सुबोधने सगळ्यांना गोंधळात टाकले आहे. सुबोधच्या Guess The Song या Quiz वर प्रसाद ओक, स्पृहा जोशी, अमृता खानविलकर या कलाकारांचा सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याच्या प्रयत्नामध्ये असणारा सुबोध भावे, यापुढे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अजून काय काय घेऊन येईल हे पाहण्यात खरी उत्सुकता आहे.