हास्याचा विनोदवीर ‘कुशल बद्रिके’ गेली अनेक वर्ष सातत्याने आपल्या सगळ्य़ांच मनोरंजन करतोय आणि महत्वाचं म्हणजे सातत्याने तो आपल्याला हसवत आहे. कुशलने त्याच्या अभिनयाची कारकिर्द 2000 साली चालू केली. सुरुवातीला ‘अल्फा मराठी’ वाहिनीवरील ‘हसा चकट फु’ या विनोदाच्या एका मालिकेत तो काम करायचा, कालांतराने कुशल चित्रपटांकडे वळला. ‘जत्रा’, ‘रंपाट’, ‘डावपेच’, ‘बायोस्कॉप’, ‘बारायण’, ‘स्लॅमबुक’, यासारख्या अनेक चित्रपटात त्याने त्य़ाचे अभिनय कौशल्य आपल्याला दाखवले.

कुशल हा फक्त एक अभिनेता नसुन तो एक ‘Voiceover Artist’ देखील आहे. हे फार कमी जणांना ठाऊक आहे. ‘प्रभो शिवाजी राजे’ या निलेश मुल्ये दिग्दर्शित ‘Animated Cartoon’ लाही त्याने आवाज दिला आहे. तो अतिशय उत्तम मिमिकरीही करतो याचा प्रत्यय तर आपल्याला ‘चला हवा येऊ द्या’, या शोमधून तर नेहमीच आला आहे. अशा या कुशाग्र कुशलने नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.
आपल्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्याने एक एक पायरी पुढे टाकत एका या नव्या घरापासून एका नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामवरुन त्याने त्याच्या नव्या घरात प्रवेश केल्याचे फोटो शेअर केले आहे.