मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे खऱ्या आयुष्यमध्ये सुद्धा सोबत आहेत. अगदी नव्वदच्या दशकातील मराठी कलाकारांपासून ते आताचे कलाकार, हे सारे कलाकार त्यांच्या अभिनयामुळे तर ओळखले जातातच, त्याच सोबत त्यांच्या जोड्या सुद्धा सगळ्यांच्या लक्षात राहिल्या. मग त्यामध्ये आपण नव्वदच्या दशकातील, सचिन पिळगांवकर - सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ - निवेदिता सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे - प्रिया बेर्डे यांसारख्या जोड्यांची नावे घेऊ शकतो. 

आताच्या चित्रपटसृष्टीमधे सुद्धा अश्या काही जोड्या आहेत, ज्या खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. ज्यामध्ये आपण प्रिया बापट - उमेश कामत, उर्मिला कोठारे - आदिनाथ कोठारे या जोड्यांची नावे घेऊ शकतात. आणि आताच्या लॉकडाउनच्या काळामध्ये या जोड्या खुप चांगल्या पद्धतीने एकमेकांची साथ निभावत आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कलाकार नेहमीच आपल्या समोर एक उत्तम उदाहरण बनून येतात. सध्या अशीच एक जोडी सोशल मीडियावर खूप चांगल्या पद्धतीने चर्चेचा विषय बनली आहे. आणि ते जोडी म्हणजे ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना, नुकतंच ईशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक कपल चॅलेंज व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ईशा आणि ऋषी त्या दोघांमधील सगळ्यात जास्त समजूतदार कोण आहे ? अश्या प्रश्नांना उत्तर देत, एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला असून खूप कमी वेळातच या व्हिडिओला प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळत आहे. या आधी सुद्धा ऋषी आणि ईशाने त्या दोघांचे गमतीदार व्हिडिओ शेअर केले आहेत.आणि मराठी कलाकारांपासून सारेजण त्यांचे हे व्हिडिओ खूप चांगल्या एन्जॉय करतात.