आपल्या आवाजाने साऱ्यांना भुरळ पाडणारे, आणि आज सुद्धा अनेक मराठी हिंदी चित्रपटांमधील गाण्याना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या गोड गायिका आशा भोसले आता, डिजिटल माध्यमातून आपल्या भेटीला येणार आल्या आहे. इंस्टाग्रामवर अकाऊंट बनवलय्यानंतर आशा भोसले आता यूट्यूबच्या मार्फत आपल्या भेटीला आल्या आहे. 

सध्याच्या स्थितीमुळे आपण सारेजण आपल्या घरामध्ये लॉकडाऊन झाले आहोत. आणि आपल्यासोबतच सारे कलाकार सुद्धा त्याच्या त्याच्या घरामध्ये लॉकडाऊन झाले आहेत. घरी राहून सुद्धा हे कलाकार आपले मनोरंजन करण्यासाठी नेहमी काही तरी नवीन घेऊन येत असतात. जेष्ठ गायिका आशा भोसले सुद्धा आपल्या चाहत्यांसाठी काही तरी वेगळं घेऊन येण्याच्या प्रयत्नामध्ये असतात, आणि त्यांचा हा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने सफल सुद्धा होतो. याच लॉकडाउनच्या दरम्यान आशा भोसले यांनी डिजिटल विश्वाची अजून एक पायरी चढली आहे. ज्यामध्ये युट्युबचा समावेश आहे. नुकतंच आशा भोसले यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हि बातमी सगळ्या प्रेक्षकांना दिली आहे. श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून, त्यांच्या साठी "मैं हूं" हे गाणं  युट्युब वर प्रदर्शित केले.
 

इन्स्टाग्राम वर अकाउंट बनवल्यानंतर, आशा भोसले आता युट्युब मार्फत आपल्या भेटीला आले आहेत. फक्त गाणी नाही तर , त्या गाण्यामागील काही आठवणी आणि त्यामागील काही खास किस्से सुद्धा आपल्याला या युट्युब चॅनेलच्या मार्फत बघायला मिळतील यामध्ये काही वाद नाही.