कोरोनाची वाढती धास्ती आणि त्यामुळे होणारे नुकसान हे सारं काही खूप भयंकर होतं चाललं आहे. पोलिस प्रसाशन, डॉक्टर्स, सफाई कामगार हे सारेजण कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र मिळून काम करत आहे. सारेजण आपल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढी मदत आणि कोरोनाविरुद्ध जनजागृती करत आहे. आणि यामध्ये आपला मराठी कलाकार सुद्धा, त्याचा सहभाग नोंदवत आहे. काही जण आपल्या घरातच राहून कोरोना  विरुद्ध जनजागृती करत आहे तर, काही जण गरजुंना अन्नदान करत त्यांची मदत करत आहे. आणि या बाबतची सगळी माहिती मराठी कलाकार त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून देत आहे. 

नुकतंच प्रसाद ओक याने त्युच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मराठी रंगभूमी, आणि चित्रपटश्रुष्टी गाजवलेले कलाकार, गायक, निर्माते यासाऱ्यानी  आरोग्य कर्मचारी, जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी राबणारे पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, आणि आपल्या पर्यंत जीवनावश्यक गोष्टी पोहोचवणाऱ्या व्यक्ती,. या सर्वांच्या मेहनतीला, कष्टांना आणि कार्याला सलाम करण्यासाठी, त्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता,आपल्या साठी लढणाऱ्या सर्वांना हि कृतज्ञता समर्पित केली आहे. नाटकामध्ये ज्याप्रकारे नांदी असते, त्याचप्रमाणे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आणि साऱ्या स्वयंसेवी कर्मचाऱ्यांसाठी हि नांदी गायली गेली आहे. अजय पुरकर, अशोक हांडे, सुमीत राघवन, सुनील बर्वे, प्रसाद ओक, राहुल रानडे या कलाकारांनी हि नांदी गायली असून, अशोक सराफ, रोहिणी हट्टगडी, आनंद इंगळे, सचिन खेडेकर, संजय मोने, संजय नार्वेकर यांसारख्या कलाकारांचा सुद्धा समावेश आहे.


या नांदीचे दिग्दर्शन नितिश पाटणकर यांनी केले असून, अक्षय जोशी यांनी लेखन केले आहे. कोरोना विरुद्ध लढणाऱ्या, आपल्या सगळ्यांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करत, त्यांच्या मेहनतीला सलाम करत हि नांदी, कृतज्ञता म्हणून समर्पित केली आहे.