सध्या लॉकडाऊन मुळे सारेजण आपल्या घरामध्ये बंद झाले आहेत. पण आपल्या सगळ्याची खबरदारी घेणारी, आपल्या सगळ्यांचे रक्षण करणारे पोलिस कर्मचारी मात्र दिवस रात्र एक करून त्यांच्या घराबाहेर तैनात आहेत. भूक तहान सारं काही विसरून हे पोलिस कर्मचारी आपल्या मदतीसाठी सदैव तयार आहेत. आणि याच पोलिस कर्मचाऱ्यांना मदतीचा हात म्हणून एक मराठमोळा शेफ पुढे आला आहे आणि तो शेफ म्हणजे पराग कान्हेरे

बिग बॉस मराठी सिजन २ मधून सगळ्यांच्या घरात पोहोचलेला हा शेफ आता सामाजिक कार्यात सुदधा हातभार लावत आहे. पोलिस कर्मचारी, ट्रॅफिक हवालदार यांसारख्या कर्मचाऱ्यांचे पोट भरण्यासाठी परागने Bigg Vadapav ही मोहीम हाती घेतली आहे. आपले वडील आणि मित्राच्या मदतीने पराग कान्हेरे नेहमी पोलिस आणि इतर सुरक्षा रक्षकांना जेवणासाठी वडा पाव पुरवत आहे. आपल्या सेवेसाठी तैनात असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अन्न पुरवण्याच्या हेतुने पराग कान्हेरे याने हा उपक्रम सुरू केला आहे. आपण समाजचे एक घटक आहोत. आणि आपल्यासाठी रात्रंदिवस एक करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी एक मदतीचा हात म्हणून परागने Bigg Vadapav हा उपक्रम सुरू केला असून, पुणे मधील खूप भागांमध्ये जाऊन पराग आणि त्याचे मित्र वडा पावचे वाटप करत आहेत. एक सेलिब्रिटी शेफ म्हणून प्रसिद्ध असणारा पराग कान्हेरे, कोरोना सारख्या गंभीर संकटामध्ये सुद्धा समाजाचे काही देणं लागतो.  याच भान राखत परागने हा मदतीचा हात पुढे केला आहे.