आपला उत्तम अभिनय, भाषाशैली वर जबर पकड, वास्तवादी कवी आणि समाजातील प्रत्येक प्रश्नाकडे वेगळा दृष्टीकोन ठेऊन बघणारा एक उत्तम  कलाकार म्हणजेच जितेंद्र जोशी, आपल्या अभिनयाने मराठी - हिंदी चित्रपटसृष्टी आणि सेक्रेड गेम्स सारख्या वेब सिरीज मधून प्रत्येकांच्या मनामध्ये घर केलेला हा कलाकार खूपच भावुक आणि समाजाशी बांधिलकी जोडणारा एक सामान्य माणूस सुद्धा आहे. 

सध्या संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. आणि यामुळे आपल्या सारखेच सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आपल्या घरामध्ये लॉकडाऊन झाले आहेत. पण या काळामध्ये सुद्धा आपले मराठी कलाकार, कोरोना विषयक जनजागृती करण्याची नवीन नवीन शक्कल लढवत आहे. मग त्यामध्ये एखादा व्हिडिओ असुदे किंवा एखादा गाणं सारेजण त्याच्या परीने कोरोना विरुद्ध लढण्याचे सल्ले आपल्याला देत आहे. जितेंद्र जोशीने सुद्धा अशीच एक वेगळी शक्कल वापरून , दिवस रात्र एक करत आपल्या सगळ्यांसाठी स्वतःचा जीव मुठीं घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्या खाकी वर्दी साठी एक रॅप सॉंग बनवलं आहे. नुकतंच जितेंद्रने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे रॅप सॉंग शेअर केले आहे. आपल्या सगळ्यांच्या सुरक्षतेसाठी, स्वतःच्या घरापासून लांब राहणाऱ्या पोलिसांसाठी, त्यांच्या कामासाठी जितेंद्रने हे रॅप सॉंग बनवले आहे. लॉकडाऊन झाल्यापासून सारे पोलिस आपल्या सेवेसाठी बाहेर तैनात आहे. पण आज सुद्धा खूप ठिकाणी पोलिसांना वाईट वागणूक दिली जात आहे. काही ठिकाणी त्याच्यावर हाणामारीचा सुद्धा प्रयत्न केला जात आहे. आणि याच सगळ्या गोष्टीच गांभीर्य लक्षात घेत, जितेंद्र जोशीने हे रॅप सॉंग बनवले आहे. रॅपर डब शर्मा यांच्या मदतीने जितेंद्र जोशीने  हे रॅप सॉंग लिहिले सुद्धा आहे. थोडी इज्जत दिखा, एक सैल्युट तो मार, पुलिसवाला भी है इंसा, वो भी पडता बीमार. असे या रॅप सॉंगचे बोल असून आताच्या गंभीर वातावरणामध्ये सुद्धा आपल्या मदतीसाठी सदैव तयार असणाऱ्या पोलिसांच्या आदरापोटी जितेंद्र जोशीने हे पाऊल उचलले आहे. आणि खूप कमी वेळातच जितेंद्र जोशींच्या पोलिस रॅपला सगळ्यांचीच पसंती सुद्धा मिळत आहे.