दगडी चाळीमधील अरुण गवळी आणि मराठी चित्रपटसृष्टी यांमधील नातं खुप जवळच असं आहे. दगडी चाळ चित्रपटामधून अरुण गवळी यांची चाळ आणि त्या संदर्भातला सगळा व्यवहार आपल्याला बघायला मिळाला. आणि आता तर हे नातं खूप जवळच असं झालं आहे, कारण मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अक्षय वाघमारे आणि अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळी या दोघांचा लग्नसोहळा पार पडला आहे. 

अक्षय वाघमारे याने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले असून, ती फुलराणी या मालिकेमध्ये सुद्धा अक्षयने काम केले आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हळदीचे आणि मेहंदीचे फोटो पोस्ट करत, अक्षयने हि बातमी त्याच्या चाहत्यांना दिली होती. दोघांची हळद आणि मेहंदी हे दोन्ही कार्यक्रम दगडी चाळीमध्येच पार पडले. आणि या दोघांचा विवाह सोहळा सुद्धा अगदी साध्या पद्धतीने, कोरोनाच्या नियमांचं पालन करून पार झाला. यावेळी लग्नाला अक्षय आणि योगिता या दोघांच्या घरातील काही मोजक्याच माणसांचा समावेश होता. मुंबईमध्ये लॉकडाऊन असून सुद्धा, मुंबई पोलिसांनी या लग्नाला परवानगी दिली, या अक्षय वाघमारे सोबत समस्त गवळी कुटुंबाने मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.अक्षय त्याच्या फिटनेसला घेऊन नेहमीच चर्चेमध्ये राहिला आहे. आणि तो दरवेळेला त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फिटनेस विषयक टिप्स आणि व्हिडिओ पोस्ट करत असतो. आणि त्याचा चाहता वर्ग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने, त्याच्या व्हिडिओला पसंती दर्शवतात.