एक दिग्दर्शकीय नजर आणि चित्रपट बनवत असताना, प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याच्या धडपडीमध्ये असणारा वास्तववादी दिग्दर्शक रवी जाधव, नेहमी आपल्या समोर काही तरी नवीन घेऊन येत असतो. आणि रवी जाधवचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने सफल सुद्धा होतो. सध्याच्या लॉकडाऊनमुळे सारे जण आपल्या घरामध्येच राहिले आहेत. आणि सारे मराठी कलाकार या वेळेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करत आहेत, काही कलाकार घर बसल्या योगा आणि त्याचे फायदे यांबद्दल आपल्याला सांगत आहे. तर काही कलाकार कुकिंगचे धडे गिरवत आहे. 

रवी जाधव सुद्धा त्याच्या या वेळेचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करत आहे. आणि रवी जाधवचे हे काम सगळ्या प्रेक्षकांसाठी एक उत्तम पर्वणी सुद्धा ठरत आहे. कारण रवी जाधवने इंस्टाग्राम अकाउंट वर, त्याच्या गाजलेल्या चित्रपटांमधील गाण्यांच्या आठवणी आणि त्या गाण्यामागे घेतेले कष्ट हे सार काही पोस्ट करत, जुन्या आठवणींना नव्याने उजाळा दिला आहे. मग त्यामध्ये नटरंग, बालगंधर्व, टाईमपास आणि लहान मुलांपासून ते त्यांच्या पालकांच्या मनावर आपली वेगळी छाप सोडलेला बालक पालक या चित्रपटांमधील काही गाजलेल्या गाण्यांचा समावेश आहे. मुख्यतः हि गाणी आपल्या बघायला मिळाली, ऐकायला मिळाली, पण या गाण्यामागे किती कष्ट घेण्यात आले, किती अडचणींना तोंड देत हि गाणी शूट झाली याबद्दलची सगळी माहिती रवी जाधवने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दिली आहे. बालक - पालक चित्रपटामधील सुसंगती सदा घडो असो किंवा बालगंधर्व चित्रपटामधील ‘नाही मी बोलत नाथा’ असो नाही तर नटरंग चित्रपटामधील 'नटरंग उभा' या गाण्यामागच्या आठवणी सांगत असत रवी जाधवने आपल्या समोर त्याचा खजिनाच सादर केला आहे. फक्त चित्रपटामधील गाणी नाही तर रवी जाधवने त्याच्या सुरवातीच्या काळात लिहिलेल्या जाहिरातींच्या आठवणी सुद्धा त्याने आपल्या समोर शेअर केल्या आहेत. मग त्यामध्ये शाहरुख खानची ची पाहिली मराठी जाहिरात असो किंवा  अजय अतुल यांची श्री गणेशा जाहिरात हे सार काही आपल्या साठी खूपच खास असं आहे. रवी जाधवने या साऱ्या गोष्टीना नव्याने उजाळा देत, त्याच्या चाहत्यांसाठी एक मेजवानी तयार केली आहे. आपल्या कामांमधून काही तरी नवीन देत रवी जाधव याने आपल्या नावाचा आणि कामाचा डंका सगळी कडे पोहचवला आहे. आणि आता लॉकडाउनच्या काळामध्ये सुद्धा रवी जाधव आपल्यासाठी काही तरी नवीन घेऊन येईल यामध्ये काही वाद नाही.