रेड झोनमध्ये हि ग्रीन झोनचा आनंद ,

संपूर्ण जगभरात कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले आहे. आणि हि गंभीर बाब आता अजूनच भयानक झाली आहे . कारण कोरोनजमुळे सध्याचा संपूर्ण महाराष्ट्र हा तीन झोनमध्ये विभागला गेला आहे. आणि यामध्ये मुख्य करून, मुंबई आणि पुणे मधील खूप सारा भाग हा रेड झोन म्हणजेच अतिदक्ष भागामध्ये मोडला गेला आहे. कोरोनामुळे सारेजण आपल्या घरामध्ये लॉकडाऊन झाले आहेत. अनेक मराठी कलाकार, खेळाडू, राजकीय पातळीवर काम करणारे सारेजण त्यांचा हा वेळ कुटुंबासोबत घालवत आहे. 

पण मराठी कलाकारांपैकी एक अभिनेत्री मात्र या रेड झोनच्या विळख्यात अडकली असताना सुद्धा ग्रीन झोनची मज्जा घेत आहे. आणि ती अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.  आणि याची माहिती प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. नुकतंच प्राजक्ताने, ‘Red Zone’ मध्ये असूनदेखील “Green Zone” मध्ये असल्याचा आनंद, असं भन्नाट कॅप्शन देत. पुणे येथील अंगणासमोर असलेल्या बागेचा एक फोटो शेअर केला आहे.ज्यामध्ये घरासमोरील अंगणामध्ये चटई टाकून एका लहान मुली सोबत खेळण्याचा आनंद  घेत आहे. याआधी सुद्धा प्राजक्ताने  तिच्या घरासमोरील बागेची साफसफाई करतानाचा फोटो शेअर केला होता. आणि या फोटोद्वारे प्राजक्ता तिच्या चात्यांना झाडे लावा, असा संदेश देत आहे. प्राजक्ता सोबत तिची आई सुद्धा या कामामध्ये तिची मदत करत आहे.

 

प्राजक्ता नेहमीच तिच्या कामांमधून प्रेक्षकांना काही तरी नवीन देण्याच्या धडपडी मध्ये असते. आणि तिचा हा प्रयत्न प्रेक्षकांच्या पसंतीस सुद्धा उतरतो. लॉकडाऊन झाल्या पासून प्राजक्ता नेहमी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर योगा  आणि डायट प्लॅन या संदर्भातले व्हिडिओ शेअर करते. आणि तिच्या या व्हिडिओस खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांच्या उपयोगाला सुद्धा येतात.