मराठी कलाकार ओळखले जातात, त्यांचा अभिनय त्यांचं काम आणि त्यांच्या कामामधील वेगळेपणा मुळे, नेहमीच आपल्यासमोर काही तरी नवीन सादर करण्याच्या धडपडीमध्ये असणारे हे कलाकार आपल्यासमोर खूप चांगले आणि अस्सल उदाहरण देऊन जातात. पण या कलाकारांचे चेहेरे आपल्यापर्यंत पोहचवण्याचं काम करतो तो म्हणजे फोटोग्राफर, नुकतंच एका मराठमोळ्या फोटोग्राफरने आपल्या समोर मराठी कलाकारांचे नवीन फोटोशूट सादर केले आहे, आणि तो म्हणजे फोटोग्राफर म्हणजे तेजस नेरुरकर 

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये आपल्या फोटोग्राफीने जादू करणाऱ्या तेजसने नुकतंच एक नवीन फोटोशूट सिरीज सुरु केली आहे. आणि ते म्हणेज #phone2Phonephotography,  या फोटोशूट मध्ये तेजसने महेश मांजरेकर, विजू  माने, रवी जाधव यांसारख्या कलाकारांचे फोन कॅमेरामधून फोटोज काढले आहेत. तेजस नेरुरकरने नुकतंच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर, मराठी सिनेसृष्टी नावाच्या कुटुंबामधील काही सदस्यांशी 'फोन कॅमेरावरून मारलेल्या गप्पा' असं कॅप्शन देत फोटोशूट सिरीज शेअर केली आहे. आणि नेहमीप्रमाणे तेजसच्या या फोटोजला प्रेक्षकांचा आणि मराठी कलाकारांचं खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.  तेजसने कलाकारांच्या फोटोज सोबत त्यांचे भन्नाट विचार सुद्धा शेअर केले आहे. या आधी तेजसने मराठी कलाकारांसोबत, २०१९ मधील कॅलेंडर वंदे मातरमचे फोटोशूट केले होते. ज्यामध्ये मराठी कलाकारांना स्वातंत्र्य सेनानींचे वेशभूषा परिधान करून, त्यांचे फोटोशूट केले होते. ज्यामध्ये स्पृहा जोशी, अमेय वाघ, प्रवीण तरडे, उमेश कामात यांसारख्या कलाकारांची वर्णी लागली होती. तेजस नेरुरकर एक फॅशन फोटोग्राफर सुद्धा आहे, पूजा सावंत, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, आदिनाथ कोठारे या कलाकारांचे सुद्धा फॅशन फोटोशूट हे त्यामधील एक उदाहरण आहे. 
फक्त मराठी चित्रपटसृष्टी नाही तर, हिंदी चित्रपटसृष्टीमधे सुद्धा तेजसने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. ज्यामध्ये आपण मलायका अरोरा खान, आयुष्यमान खुराणा, कीर्ती सेनन, दिया मिर्जा, भूमी पेडणेकर, शिल्पा शेट्टी यांसारख्या बॉलिवूड कलाकारांचे फोटोशूट सुद्धा तेजसने केले आहे. त्याचसोबत महेंद्र सिंग धोनी, रोहित शर्मा, देवेंद्र फडणवीस या दिग्गजांचे फोटोशूट सुद्धा तेजस नेरुरकर या मराठमोळ्या फोटोग्राफरने केले आहे. पुढे सुद्धा तेजस नेरुरकर आपल्या नावाचा डंका असाच वाजवत राहील यामध्ये काही वाद नाही.