सध्या सगळीकडे कोरोनाचे सावट पसरले आहे. आणि यामुळे सारेजण आपल्याला आपल्या घरामध्ये बंद  झाले आहेत. मग यामध्ये सामान्य व्यक्तींपासून मराठी कलाकारांचा सुद्धा समावेश आहे. नेहमी आपले  मनोरंजन करण्यासाठी तयार असणारे हे कलाकार घरामध्ये राहून सुद्धा आपले मनोरंजन करत आहेत. मग ते व्हिडिओच्या मार्फत असो किंवा सोशल मिडीयाच्या मार्फत, सारेजण आपल्या परीने आपले मनोरंजन करत आहे. 

शूटिंगच्या निमित्ताने नेहमी घरा बाहेर असणारे हे कलाकार आज त्यांच्या कुटुंबासोबत त्याचा वेळ घालवत आहे. मग यामध्ये स्वतःचा छंद जोपासणं असुदे,  आपल्या  कुटुंबासोबत जेवण बनवणं असो किंवा मुलांसोबत वेळ घालवणं या लॉकडाउनच्या काळामध्ये सारे कलाकार जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देत आहे. नुकतंच सतीश राजवाडेने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मुलीसोबत भातुकलीचा खेळ खेळतानाचा, आणि Stay Home Stay Safe, सहा कुटुंब सहा परिवार असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर केला आहे. या लॉकडाउनच्या काळामध्ये आपल्या कामाला बाजूला ठेवत, सतीश राजवाडेने त्याचा वेळ त्याच्या मुलीला दिला आहे. योहानासोबतच  भातुकलीचा खेळ खेळतानाचा या व्हिडिओला खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आणि खूप वेळातच या व्हिडिओवर लाईक्स आणो कंमेंट्सचा वर्षाव होत आहे. 


सतीश राजवाडे त्याच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटवरून नेहमीच आपल्या प्रेक्षकांसोबत संवाद साधत असतो. आणि दरवेळेला आपल्या चित्रपटामधून आणि मालिकांमधून काही तरी नवीन देण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. ज्यामध्ये आपण आवर्जून मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाची ट्रायोलॉजि असो किंवा ती सध्या काय करते आणि प्रेमाची गोष्ट यांसारखे चित्रपटांची नावे घेऊ शकतो.